नागपूर - विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील सहापैकी दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण या दोनच मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. यामुळे केवळ या दोनच मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. उर्वरित चार मतदारसंघातील इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.