- अखिलेश गणवीरनागपूर : वयाची ६६ वर्षे ओलांडलेली. जीर्ण घराचे छत कोसळून पायात लोखंडी सळाख घुसल्याने तीन ऑपरेशन झाले. तरीही हातात काठी घेऊन जीर्ण घराला आधार मिळावा म्हणून सरकारी कार्यालयात निराधार वृद्ध महिला संघर्ष करीत आहे. .सरकारी दरबारी येणारा अनुभव निराशाजनक असला तरी तिचा संघर्ष अजूनही थांबलेला नाही. उषाबाई मोहिते, असे वृद्ध महिलेची हृदयाचा ठाव घेणारी करुण कहाणी आहे. गंगाबाई घाटाजवळील भुतेश्वर नगर येथे राहणाऱ्या उषाबाई यांचे दोन खोल्यांचे घर आहे. बांधकामाला ५५ वर्षाहून अधिक कालावधी लोटून गेला. घरात कुणाचा आधार नाही. एकट्या राहणाऱ्या उषाबाई एकेदिवशी ओले कपडे छतावर वाळविण्यासाठी गेल्या असता स्लॅप सकटच त्या खाली कोसळल्या. पायात लोखंडी सळाख घुसली. .Mumbai Highcourt : प्रेयसी ही पतीची नातेवाईक नाही; हायकोर्टचा निर्वाळा, कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत दाखल झालेला गुन्हा रद्द.गंभीर जखमी उषाबाई यांना उपचारासाठी मोठा खर्च आला. तब्बल तीन शस्त्रक्रिया त्यांच्या पायावर झाल्या. घर बांधण्यासाठी पैसे नाही. घरी कुणाचा आधार नाही. जीर्ण घर पुन्हा कोसळून जिवाचे नको ते होऊ नये म्हणून मनात वाढलेली धाकधूक सरकारी दरबारी मांडण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.मनपा, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात पायपीटदोन खोल्यांचे घर बांधण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे एखाद्या घरकूल योजनेत आपल्या जीर्ण घराचा समावेश करून ते बांधण्यासाठी पैसे मंजूर करावे, यासाठी उषाबाई यांचा सरकारी दरबारी लढा सुरू आहे. .Nagpur News : कंत्राटी वाहनचालकांचे पगार थकले; जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील प्रकार.त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महापालिकेला सुद्धा अर्ज करून पाठपुरावा केला. एवढेच नाही तर ४ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेत घेतलेल्या जनसंपर्क कार्यक्रमात त्या तक्रार घेऊन आल्या होत्या. मात्र, निराशाच पदरी पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.पडक्या जीर्ण घराचे छत कोसळले. मृत्यूशी संघर्ष करीत जीव वाचला. घरी कुणीही कर्ता व्यक्ती नाही. त्यामुळे पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून एखाद्या घरकूल योजनेत घर बांधून मिळावे, एवढीच अपेक्षा आहे. त्यासाठी सरकारी कार्यालयात अर्ज केला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.- उषाबाई मोहिते, पीडित महिला.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.