नागपूर: बुडापेस्ट (हंगेरी) येथे १० ते २३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला व पुरुष संघाने सुवर्णपदक पटकाविले होते. भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करणारी नागपूर येथील आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.