जीवन संपविण्यापूर्वी आईचा मुलींवर प्रेमाचा वर्षांव

जीवन संपविण्यापूर्वी आईचा मुलींवर प्रेमाचा वर्षांव
Updated on

नागपूर : दारुड्या पतीचा त्रास सहन करणाऱ्या माउलीच्या सहनशीलतेचा आता अंत झाला होता. बुधवारी सकाळीच ढोसून आलेल्या नवऱ्याने पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढले. पती मारत असताना दोन वर्षांच्या जुळ्या मुली भुकेने व्याकूळ झाल्याने रडत होत्या. आता जगण्यात काहीच अर्थ नाही असे समजून ही माता तीन मुलींना घेऊन गांधीसागर तलावावर पोहोचली. दारुड्या पतीची दररोजची मारहाण आणि कटकटीला कंटाळलेल्या महिलेने तीन चिमुकल्या मुलींसह गांधीसागर तलावात उडी घेऊन जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. मुलींना पाण्यात ढकल्यापूर्वी शेवटचे लाड म्हणून या मातेने चारही मुलींचे पटापट मुके घेतले. ती त्यांना छातीची कवटाळून मायेने डोक्यावर हात फिरवत होती. या मातेच्या हालचाली तलावावर देवदूत म्हणून कायम उपस्थित असलेले जगदीश आणि जयश्री खरे यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. उडी टाकण्यापूर्वीच खरे यांनी चौघांनाही वाचवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय महिलेला पाच वर्षांची मोठी मुलगी तर दोन वर्षांच्या जुळ्या मुली आहेत. महिला चार घरी धुणीभांडी करते. तिचा पती रोजमजुरी करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. दारू प्यायल्यानंतर तो घरात तोडफोड करतो आणि मुलींना आणि महिलेला मारहाण करतो. बुधवारी सकाळी नऊ वाजताच तिचा पती दारू पिऊन घरी आला. त्याने तिला मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले. तिने तिन्ही मुलींना घेतले आणि चौकात आली. भुकेने मुली रडायला लागल्या. ती थेट मुलींना घेऊन गांधीसागर तलावावर पोहोचली.

जीवन संपविण्यापूर्वी आईचा मुलींवर प्रेमाचा वर्षांव
शीतपेयातून गुंगीचे औषध देत मामाने केले भाचीशी अश्‍लील चाळे

मुलींच्या चेहऱ्यावरून फिरवत होती हात

महिला तलावाच्या काठावर मुलींसह बसली. मोठ्या मुलीला बाजूला बसवले आणि जुळ्या मुलींच्या चेहऱ्यावरून वारंवार हात फिरवून अश्रू गाळत होती. काहीच वेळात मुलींची जीव जाणार या कल्पनेने ती शेवटची भेट म्हणून मुलींचा लाड करीत होती. मोठ्या मुलीला वारंवार छातीशी धरत होती. हा प्रकार खरे दाम्पत्यांच्या लक्षात आला. दोघांनीही लगेच त्या महिलेकडे धाव घेतली. गणेशपेठ पोलिसांना फोन लावला. दोन्ही मुलींचा हात पकडून ठेवला आणि महिलेची चौकशी केली.

पोलिसांसह परतली घरी

गणेशपेठमधील एपीआय वृषाली वडस्कर यांनी महिलेचे आस्थेने चौकशी केली. तिची समजूत घातली. तिच्या पतीचा शोध घेतला. पोलिसांच्या पथकासह तिला घरी पोहोचून दिले. तिच्या नातेवाइकांना बोलावून त्यांची समजूत घातली. अशाप्रकारे पोलिस आणि खरे दाम्पत्याने चौघींचा जीव वाचवला.

जीवन संपविण्यापूर्वी आईचा मुलींवर प्रेमाचा वर्षांव
थोबाडात हाणण्याची भाषा करणारे मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार

आठवडाभरात वाचविले ७ प्राण

गेल्या आठवडाभरात खरे दाम्पत्याने ७ जणांचे प्राण वाचविले. बुधवारी आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिला व तीन मुलींसह शिक्षकाचा समावेश आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी १७ वर्षांच्या मुलाची जीव त्यांनी वाचविला होता. तीन दिवसांपूर्वी एका ६० वर्षांची वृद्धा तलावावर आत्महत्या करण्यासाठी आली होती. तिचाही जीव वाचविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.