Audi Car Accident : मुलाच्या 'कार'नाम्याचा बावनकुळेंना फटका; सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे 'संकेत'

Audi Car Accident case : रामदासपेठ परिसरात रविवारी (ता. ९) मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या आलिशान ऑडी गाडीने दोन मोटारी व एका दुचाकीला धडक दिली.
Audi Car Accident case
Audi Car Accident caseesakal
Updated on
Summary

सात तासानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीनंतर हे प्रमाण आढळून आले. त्यामुळे मद्य प्यायले असताना संकेतने त्यांना मोटार चालविण्यास दिली.

नागपूर : रामदासपेठ परिसरात तीन वाहनांना धडक दिलेल्या ऑडी मोटारीचा चालक अर्जुन हावरे आणि रोनित अजय चित्तमवार यांच्या शरीरातील रक्तात मद्याचे अंश असल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. त्यामुळे मद्याच्या नशेत असलेल्या मित्रांना मोटार चालविण्यास दिल्याप्रकरणी ‘ऑडी’चा मालक संकेत चंद्रशेखर बावनकुळे (Sanket Chandrashekhar Bawankule) याच्यावर सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.