गडकरींच्या पत्रानंतर ऑडिओ क्लीप व्हायरल, ठेकेदारांना धमकाविताना खासदाराचा उल्लेख

audio clip
audio clipe sakal
Updated on

नागपूर : राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये शिवसैनिक अडथळा आणत आहेत. तसेच ठेकेदारांना धमक्या देत आहेत, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी लिहिले आहे. त्यानंतर आता एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत असून ही क्लीप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवसैनिक महादेव ठाकरेंची (shivsainik mahadeo thackeray) असल्याचे सांगितले आहे. यामध्ये ते ठेकेदारांना धमकावत असलेल्या आवाज येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालकांना धमकावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

audio clip
'कामात अडथळा', नितीन गडकरींचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

ठेकेदाराला धमकावणारे रिसोडचे तालुकाप्रमुख महादेव ठाकरे आणि वाशिमचे तालुकाप्रमुख रामदास मते, हे दोघेजण असल्याचेही सांगण्यात येत आहे. ठेकेदाराला धमकावताना त्यांनी तुम्ही ऐकत नसाल, तर खासदारांना सांगतो, असे म्हटल्याचाही उल्लेख आहे.

नेमकं काय म्हटलं क्लिपमध्ये? -

या क्लिपमध्ये धमकावणारा व्यक्ती ठेकेदाराला रस्त्याचे काम थांबविण्यासाठी सांगत आहे. गेल्याच वर्षी पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामाची यंदाच डागडुजी करण्याची वेळ का आली? असे विचारतो. त्यानंतर जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत काम थांबवा, असे सांगतो. त्यानंतर किनवटजवळचा रस्ता खराब झाल्याचे ठेकेदाराला सुनावले जात आहे. त्यावर ठेकेदार म्हणतात की, ही बाब तुम्ही एनएचएआयच्या अधिकाऱ्यांशी बोलून घ्या. त्यांनी सांगितल्यास किंवा आम्हाला नोटीस दिल्यास आम्ही तत्काळ काम थांबवू. त्यानंतर धमकावणारा म्हणतो की एकदम कायदे आणि नियमांवर जाऊ नका.

ठेकेदार म्हणतो की, मी देवगावला आहे. तुम्ही येथे येऊ नका. एक तासात मीच तिकडे येतो. तरीही एक तास काम बंद ठेवा, आम्ही तुमच्या कामावर आहो, असे ठेकेदाराला धमकावले जाते. तुमचे बोलणे खासदार मॅडमशी करून देतो. त्यानंतर वाटल्यास खुशाल काम सुरू ठेवा, असेही ठेकेदाराला सांगितले जाते. लक्षात ठेवा, तुम्ही बोगस कामे करीत आहात. आधी ‘ताईसाहेबांशी’ बोलून घ्या, अन् मग काम सुरू करा. कारण हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्‍न आहे, असे धमकावणारा ठेकेदाराला सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.