Nagpur Airport Threat : नागपूर विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; परिसराची कसून तपासणी

विमानतळावरील सुरक्षा तत्काळ वाढविण्यात आली. सुरक्षेच्या कारणावरून प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली
Nagpur Airport Bomb Threat
Nagpur Airport Bomb ThreatSakal
Updated on

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ बॉम्बने उडविणार असल्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवारी दुपारी एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) मिळाला. या धमकीमुळे विमानतळ परिसरात खळबळ उडाली.

संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली. विमानतळावरील सुरक्षा तत्काळ वाढविण्यात आली. सुरक्षेच्या कारणावरून प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली. अशा प्रकारचा ई-मेल येण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे नागपूरसह देशभरातील ४१ विमानतळांनाही धमकीचा ई मेल मिळाला आहे. यापूर्वीही २९ एप्रिलला विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाली होती.

दिल्ली, पाटणा, जयपूर, वाराणसी यांसह देशभरातील ४१ विमानतळांवर बॉम्ब असल्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवारी दुपारी १२.३० ते १ वाजतादरम्यान मिळाला. विमानतळांवर बॉम्बस्फोट घडविण्याचा ई-मेल धडकल्याने विमानतळ प्रशासनाला धडकी भरली आहे.

वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रुही यांनी सांगितले की, दुपारी एक वाजतादरम्यान एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाला विमानतळ उडविण्याचा मेल आला. त्यांनी विमानतळ प्रशासन म्हणून मिहान इंडिया लिमिटेडला तो मेल फॉरवर्ड केला. त्या ई-मेलमध्ये नागपूर विमानतळावर बॉम्ब असल्याचे म्हटले आहे. या माध्यमातून मोठा स्फोट घडविण्याची तयारी असल्याची भीती लक्षात घेत लागलीच संपूर्ण यंत्रणा कामाला लागली.

विमानतळावर बॉम्ब डिटेक्शन अॅण्ड डिस्पोजल स्क्वाड (बीडीडीएस) आणि श्वान पथक तैनात करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) चमूद्वारे संपूर्ण विमानतळासह प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

आता दक्षता बाळगण्यात येत आहे. सुरक्षा तपासणीत वाढ करण्यात आली आहे. पार्किंग परिसरात वाहनांची तपासणी केली जात आहे. विमानतळाच्या हद्दीबाहेरही गस्त घालण्यात येत आहे. विमानतळाच्या सुरक्षेत पोलिस कार्यरत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पुढील काही दिवस विमानतळावर कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा इ मेल मंगळवारी दुपारी मिळाला. तातडीने सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि विमानतळाची तपासणी केली. तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नाही. मात्र, विमानतळावर हायअलर्ट दिलेला आहे.

- आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक. नागपूर विमानतळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com