अवनीचा बछड्याची जंगलात मुक्तता; मागोवा घेण्यासाठी रेडिओ कॉलर बसविले

Avnis calf released in the forest Installed a radio collar for tracking
Avnis calf released in the forest Installed a radio collar for tracking
Updated on

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा जवळील जंगलात तीन वर्षांपूर्वी शिकार केलेल्या अवनी वाघिणीच्या बछड्याला (मादी शावक) पेंच व्याघ्र प्रकल्पात मुक्त पणे संचार करण्यास मुक्त करण्यात आले आहे. अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या बछड्याला म्हणजेच मादी बछड्याला पेंच व्याघ्र प्रकल्पातील तिरतारमांगली येथील मोठ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. तिचा मागोवा घेण्यासाठी रेडिओ कॉलर बसविण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आणि राळेगाव तालुक्यात अवनी या वाघिणीने १३ व्यक्तींवर हल्ला करून ठार मारले होते. त्यामुळे वन विभागाने अवनीला ठार मारण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी तत्कालीन वनमंत्री यांच्या आदेशानुसार असगर अली या खासगी शिकाऱ्याची नेमणुक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले होते.

असगरच्या मुलाने अवनी या वाघिणीला ठार मारले. त्यानंतर तिच्या बछड्यांचा जिवंत ठेवणे आणि पालनपोषणाचा प्रश्न पुढे आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर अवनीचा बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने अनेक प्रयत्न केले. त्यावेळी मात्र तीन वर्षांपूर्वी एका बछड्याला (मादी शावक) पकडण्यात यश आले होते.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांनुसार या बछड्याला शिकारीचे प्रशिक्षण देण्यात येत होते. हा बछडा तीन वर्ष वयाचा झाला आहे. त्यामुळे पूर्ण वाढ झालेल्या या वाघिणीला निसर्गमुक्त करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. ही वाघीण पीटीआरएफ-८४ या नावाने ओळखली जाणार आहे.

वाघ जंगलात मुक्तीचा इतिहास

राज्यात काथलाबोडी येथील विहरीत पडलेल्या वाघिणीला बाहेर काढल्यानंतर बंदीस्त केले होते. त्यानंतर तिच्यावर उपचार करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) रामबाबू यांच्या पुढाकाराने त्या वाघिणीला अधिवासात मुक्त केले होते. ही राज्यातील पहिलीत घटना होती. त्यानंतर अनेक वाघांना जंगलात मुक्त केले, त्यातील काही प्रयत्न अपयशी ठरले. मात्र, काथलाबोडी येथील वाघिणीचा प्रयोग यशस्वी झाला असून त्या वाघिणीने आतापर्यंत चार वेळा बछड्यांना जन्म दिला आहे. ते बछडे नागपूरच नव्हे तर वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातही वास्तव्यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.