Kidney Donation : बादलच्या किडनीदानातून दोघांना जीवनदान

नाव बादल रमेश चव्हाण. अवघ्या सत्तावीस वर्षांचा तरुण. खासगी नोकरी. अपघातामध्ये जखमी झाला. मेंदूला जबर दुखापत झाल्याने मेंदूपेशी मृत झाल्याचे निदान झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
Kidney Donation
Kidney Donationsakal
Updated on

नागपूर : नाव बादल रमेश चव्हाण. अवघ्या सत्तावीस वर्षांचा तरुण. खासगी नोकरी. अपघातामध्ये जखमी झाला. मेंदूला जबर दुखापत झाल्याने मेंदूपेशी मृत झाल्याचे निदान झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र दुःखाला बाजुला सारत काळजाच्या तुकड्याचे आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेऊन चव्हाण कुटुंबीयांनी अवयवदानाच्या चळवळीला हातभार लावला. बादलच्या किडनीदानातून दोघांना जीवनदान मिळाले.

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील वसंतनगर येथील बादल रमेश चव्हाण (वय २७) हा खासगी नोकरी करत होता. त्याच्या कुटुंबात वडील रमेश, आई छाया व बहिण किरण असे कुटुंब. बादल कामानिमित्ताने दुचाकीने बाहेर जात असतनाच वाटेत दोन दुचाकींमध्ये धडक झाली. यामध्ये बादलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला तातडीने वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

सलग पाच दिवस उपचार सुरू होते. त्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने त्याला नागपुरातील विवेका हॉस्पीटल येथे हलवण्यात आले. येथे तो उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.

दरम्यान डॉक्टरांच्या पथकाने तातडीने तपासण्या केल्या. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. अशातच न्यूरोलॉजीकलदृष्ट्या त्याची प्रकृती खालाविल्याने डॉक्टरांच्या पथकाने त्याला मेंदूपेशी मृत (ब्रेनडेड) घोषित केले.

माहिती कुटुंबियांना देत अवयवदानाविषयी समुपदेशन केले. विभागीय अवयवदान समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि सचिव डॉ. राहूल सक्सेना यांना सूचना दिली. यानंतर प्रतीक्षा यादी तपासण्यासाठी दिनेश मंडपे यांना सूचना दिली. त्यातच बादलच्या वडिलांनी त्याच्या दोन्ही किडनी दानासाठी संमती दर्शविली. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली.

असे झाले दोघांना किडनी दान

बादलची एक किडनी विवेका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ५५ वर्षीय पुरुषावर तर दुसरी किडनी उपराजधानीतील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये किडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या ६२ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आली. दोघांना नव्याने जीवनदान मिळाले. उपराजधानीतील हे १४९ वे अवयवदान आहे, अशी माहिती दिनेश मंडपे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.