बीबीए, बीसीए नेमके कोणत्या विभागाकडे? डीटीए, डीएचईच्या पत्रामुळे घोळ; विद्यार्थी, पालक संभ्रमात

राज्यातील बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली आले. मात्र, राज्याच्या उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून या अभ्यासक्रमातील महाविद्यालयांना उच्चशिक्षण विभागात नोंदणी करण्यास सांगण्यात आले.
BBA BCA to which department exactly due to letter from DTA DHE Students parents confused
BBA BCA to which department exactly due to letter from DTA DHE Students parents confusedsakal
Updated on

नागपूर : राज्यातील बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली आले. मात्र, राज्याच्या उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून या अभ्यासक्रमातील महाविद्यालयांना उच्चशिक्षण विभागात नोंदणी करण्यास सांगण्यात आले.

मात्र, आता पुन्हा राज्याच्या सीईटी सेलने नवे पत्र काढून महाविद्यालयांना उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडे नोंदणी करण्यास सांगितल्याने हे दोन्ही अभ्यासक्रम नेमके कोणत्या विभागात आहेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाची सुमारे ४६७ महाविद्यालये असून त्यामध्ये दोन लाखावर जागा आहेत. यावर्षी प्रथमच हे अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली आले. त्यामुळे यापुढे प्रवेशासाठी एआयसीटीईच्या नियमांनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे ठरविण्यात आले.

BBA BCA to which department exactly due to letter from DTA DHE Students parents confused
BBA-BCA CET Exam : बीबीए, बीसीए सीईटीच्‍या नोंदणीची मंगळवारपर्यंत मुदत

त्यानुसार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या वतीने सीईटी सेलमार्फत अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे ठरले. मार्चमध्ये निर्णय घेत, जूनमध्ये सीईटी घेण्यात आली. त्याबाबत पूर्वकल्पना नसल्याने हजारो विद्यार्थ्यांना त्याबाबत माहितीच नव्हती.

त्यामुळे अतिशय अल्प प्रमाणात विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी त्याविरोधात निवेदने दिल्यानंतर सीईटी सेलच्या माध्यमातून पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान तत्पूर्वी १८ जुलै रोजी राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून पत्र काढून महाविद्यालयांना पुण्यातील कार्यालयात शुल्काचा भरणा करण्याचे सांगण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी तिथे गर्दी करीत शुल्काचा भरणा केला.

मात्र, ३० जुलैला उच्च व तंत्रशिक्षण संचालनायाद्वारे पत्र काढून या अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश प्रक्रिया त्यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येईल असे सांगितले गेले. त्यामुळे महाविद्यालयांना तिथेही नोंदणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नेमके कोणते पत्र खरे मानायचे ? असा प्रश्‍न आता महाविद्यालयांसमोर उपस्थित झाला आहे.

BBA BCA to which department exactly due to letter from DTA DHE Students parents confused
Nagpur Crime : स्वाक्षरीसाठी अपहरण करून मध्यप्रदेशातून आणले नागपुरात; भागीदारांमधील वादातून तिघांवर गुन्हा

प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत

बीबीए आणि बीसीएसह इंटीग्रेटेड एमबीए आणि एमसीएसाठी उच्च व तंत्रशिक्षण संचालनायाद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येण्याचे पत्र आले असताना, संचालनालयाकडून ती जबाबदारी राज्याच्या सीईटी सेलची असल्याचे सांगण्यात येत आहे. अशावेळी नेमके प्रवेश कुणाकडून होणार याबाबत संभ्रमावस्था कायम आहे.

याबाबत सांगताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रभारी सहसंचालक सचिन सोलंकी यांनी केवळ पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया डीटीईकडून राबविण्यात येत असून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ‘सीईटी सेल’च्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

BBA BCA to which department exactly due to letter from DTA DHE Students parents confused
Nagpur Crime : २२ हजार रुपये उकळत युवतीला ठेवले डांबून; नोकरीच्या नावावर केला मानसिक, शारीरिक छळ

रिक्त जागांसाठी कोण जबाबदार ?

बीबीए, बीसीएसाठी असलेल्या घेण्यात आलेल्या सीईटीमध्ये जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. अशावेळी राज्यातील महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार आहे. याआधी प्रथम अभियांत्रिकी शाखेसाठी सीईटी लावल्यावर रिक्त जागा भरण्याची परवानगी विद्यापीठांना देण्यात येत होती.

त्याप्रमाणे बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांनाही अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेशाची संधी उपलब्ध करून देता येईल किंवा महाविद्यालय स्तरावर गुणवत्ता यादी लावून प्रवेश देता यावा असा निकष लावण्याची मागणी महाविद्यालयांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.