कळमेश्वर : सध्या शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. अशावेळी बाजारात बोगस कंपन्या, खासगी एजंट, खासगी व्यक्ती, परवाना नसलेले अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांचा पुरवठा करतात. शासनाने अनधिकृत केलेले एचटीबीटी बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.
या जिल्ह्यात होणार संशयितांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन, नंतर घेणार थ्रोब स्वॅब
तणनाशक बीटी, आरआरबीटी, चोर बीटी, बीजी 3 ही अनधिकृत बीटी बियाणे आहेत. या बियाण्यांना शासनाची कुठलीही मान्यता नाही. एचटीबीटी बियाणे लागवडीनंतर ग्लायफोसेट तणनाशक फवारण्याची बनावट कंपनी व विक्रेते शिफारस करतात. मुळात ग्लायफोसेट तणनाशक कार्सिनोजेनिक गुणधर्माचे असून, त्याच्या वापरामुळे मानवास कर्करोगाचा धोका असतो.
त्याच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होऊन भविष्यात कोणतेही पीक घेताना अडचण येते. जमीन नापीक होते. त्यामुळे मान्यता नसलेल्या एचटीबीटी काससाची लागवड रोखण्यासाठी व कार्सिनोजेनिक गुणधर्म असलेल्या ग्लायफोसेटच्या वापरामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी उत्पादित व अधिकृत बियाणे विक्री परवानाधारकाकडून परवानगी असलेली कापूस बीटी बियाणे खरेदी करा, तसेच फसवणूक टाळण्यासाठी, बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून राज्यात परवानगी असलेली अधिसूचित बियाणे पावतीसह खरेदी करा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अनधिकृत कापूस बियाणे लागवड केलेल्या कापूस पिकाचे नमुने व उत्पादित कापसाचे नमुने घेऊन त्याची एचटीबीटी जनुके तपासणी करण्याचे तंत्रज्ञान आले आहे. त्याचे नमुने तपासणी करण्यात येईल आणि या तपासणीत एचटीबीटी जनुके आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले.
खरीप पेरणीसाठी गावातच बियाणे द्या
हिंगणा : कोविड-19 आजारामुळे शहर व तालुक्याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच बी-बियाणे व खते उपलब्ध करून द्यावी, अशा आशयाचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप ठाकरे यांनी दिले. शेतीचा हंगाम सुरू झाल्याने बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ शकते. गर्दी टाळण्यासाठी शासनातर्फे बी-बियाणे, खते, शेतीला मशागतीची अवजारे देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाप्रमुख प्रदीप ठाकरे, राजू कोल्हे, महेंद्र डाफ यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.