ब्रॅंड असली, आतमध्ये माल नकली?

चकचकीत वेष्टनात आलेली वस्तू बनावटही असू शकते. याचे चेहरा, त्वचा, डोळे आणि केसांवर दुप्षपरिणाम होऊ शकतात.
beauty makeup
beauty makeup
Updated on

चित्रपट, टी.व्ही. चॅनल्सवर सौंदर्यप्रसाधनांच्या आकर्षक जाहिराती पाहून आपणही सुंदर व आकर्षक दिसावे अशी इच्छा सर्वांच्या मनात असते. तसेच सोशल माध्यमे आणि संकेतस्थळावरूनही जाहिरातींचा मारा होतो. सौंदर्य प्रसाधने ऑनलाइन खरेदी केल्या जातात. तथापि, तज्ञांचा सल्ला न घेता व स्कीन टेस्ट न करता या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणे जोखमीचे ठरू शकते. काहीवेळा चकचकीत वेष्टनात आलेली वस्तू बनावटही असू शकते. याचे चेहरा, त्वचा, डोळे आणि केसांवर दुप्षपरिणाम होऊ शकतात.

बाहेर पडताना कपड्यांवर शिंपडली जाणारी सुगंधी द्रव्यें, लिपस्टिक, नेल पॉलिश, त्वचेवर लावण्यात येणारी क्रिम तसेच सुरकुत्या कमी करून चेहऱ्यावर तारुण्य फुलवणाऱ्या प्रसाधनांची बाजारपेठ जागतिक दर्जाची आहे. व्यक्तिमत्व आकर्षक दिसत असल्याने ही प्रसाधने गरजेची वस्तू बनली आहेत. तारुण्यांच्या उंबरठ्यावरील तरुणाईपासून तर चेहऱ्यावर सुरकुत्या पडून नये, सदैव तरूण दिसावे असा ध्यास उराशी बाळगून वयस्कही प्रसाधानांचा वापर करतात. बाजारपेठ वाढल्यामुळे नफेखोरीच्या हेतूने बनावट सौंदर्य प्रसाधनांचाही वापर वाढला आहे. परंतु या प्रसाधनांचा वापर करताना केवळ सौंदर्य बघितले जाते, आरोग्याच्या दृष्टीने त्याकडे बघितले जात नाही, ही खंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या त्वचारोग विभागाचे प्राध्यापक डॉ. जयेश मुखर्जी यांनी व्यक्त केली.

सावधानता बाळगा

पार्लर, सलून्समध्ये जाणाऱ्या ग्राहकांना बनावट सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जात आहे, याची कल्पनाही येत नाही. म्हणून सौंदर्य प्रसाधने कितपत सुरक्षित आहे याबाबत शहनिशा करावी. बनावट दुष्परिणामांची माहिती ग्राहकांनी जाणून घ्यावी. ग्राहकांनी सावधानता बाळगणे हाच बनावट प्रसाधनांवरील पर्याय आहे.

बनावट सौंदर्य प्रसाधनांचे धोके

  • ऍलर्जी होण्याचा धोका

  • त्वचेला खाज सुटण्याची भीती

  • त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता

  • कलपाचा अतिवापर धोकादायक

  • चेहरा सुजणे, लाल होण्याची समस्या

''टीटॅनियम ऑक्‍साइड व जस्त यांच्या अब्जांश कणांचा वापर सौंदर्य प्रसाधनांमध्ये होतो. त्वचा जळणे, उन्हाची एलर्जी होणे तसेच केसांत कोंडा होण्यासारखे दुष्परिणाम दिसले की, सौंदर्य प्रसाधने बनावट आहे, असे हमखास समजावे. स्ट्रेराईडचा अतिवापर टाळावा. यामुळे सूर्यकिरणांचा त्वचेवर परिणाम होवुन त्वचा पातळ होते.''

-डॉ. जयेश मुखी, सहयोगी प्राध्यापक, त्वचारोग विभाग, मेडिकल, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.