नागपूर : महिलांचे सौदर्यं वाढविण्यासाठी काम करणाऱ्या अनेक ब्युटीशियनचा व्यवसाय कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन झाला आहे. याकाळात महिलांनी घरीच आपल्यासाठी सौदर्यंटिप्स आणि घरगुती वस्तुंचा वापर करून त्वचेची काळजी घेण्यास सुरूवात केली. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ एकमेकींना पाठवून आपले अनुभव शेअर करीत, घरच्या घरी सौदर्यं खुलविण्याची कला कोरोनाने महिलांना शिकवली आहे.
फेशियल, हेअरकट, आयब्रोज, थ्रेडिंग, व्हॅक्सिंग...अशा चेहरा, केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविणाऱ्या सेवा देणाऱ्या "ब्युटी पार्लर' व्यवसायाचे वर्तमान आणि भविष्य कोरोना संकटामुळे चांगलेच काळवंडले आहे. "लॉकडाउन' मुळे गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील ब्युटी पार्लर व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर चालविणाऱ्या किंवा घरोघरी जाऊन सौंदर्योपचार सेवा देणाऱ्या "ब्युटी पार्लर' व्यावसायिक चांगल्याच हवालदिल झाल्या असून, दुकानाचे भाडे, बॅंकांचे हप्ते कसे फेडायचे, उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल करीत आहेत. ब्युटी पार्लरमध्ये गेल्याने कोरोनाचा प्रसार वाढू शकतो अशी शक्यता वर्तविल्याने, महिला ब्युटीपार्लरमध्ये जाणे टाळत असल्या तरी, घरच्याघरी सौंदर्य वृद्धीसाठी विविध प्रयोग केले जात आहेत.
काही उपयुक्त फेस पॅक
घरीच वाढवा सौदर्यं
बनाना स्क्रब तयार करण्यासाठी दोन पिकलेली केळी कुस्करून घ्या. त्यात साखर घाला. यात चमचाभर मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि धुवून टाका.
हातापायांसाठी लेमन स्क्रब तयार करू शकता. हे स्क्रब चेहऱ्याला लावू नका. हे स्क्रब तयार करण्यासाठी अर्ध लिंबू घ्या. हे लिंबू साखरेत बुडवा आणि हातापायांवरून फिरवा. पाच ते सात मिनिटांनी गरम पाण्याने धुवून टाका.
पपईचं स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा कप पिकलेली पपई घ्या. पपई कुस्करून घ्या. त्यात थोडं दही घाला. लिंबाचा रस आणि मध घाला. चेहऱ्याला लावा. थोड्या वेळाने धुवून टाका.
हनी अँड ऑरेंज स्क्रब तयार करण्यासाठी संत्र्याच्या सुकलेल्या सालीची दोन टेबलस्पून पावडर आणि तितकेच ओट्स घ्या. यात मध घाला. जाडसर मिश्रण तयार करा. चेहऱ्यावर लावा. पाच मिनिटांनी धुवून टाका.
ओट्स आणि टोमॅटो स्क्रब तयार करण्यासाठी थोडे ओट्स घ्या. पिठीसाखर आणि पिकलेले टोमॅटो घ्या. टोमॅटोचे मोठे तुकडे करा. एका तुकड्यात ओट्स आणि साखर भरा. हा टोमॅटो चेहऱ्यावर घासा. पाच ते सात मिनिटांनी चेहरा धुवा.
सविस्तर वाचा - मुंढे साहेब, सातशे जणांना क्वारंटाईन करण्याची वेळ कोणामुळे आली आता माफी मागा...
स्वयंपाकघरातील ब्युटी पार्लर
ब्युटीशियनचा थेट चेहऱ्याशी संपर्क येतो त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळता येणार नाही. लॉकडाऊनच्या काळात आम्ही घरीच किचनमधील साहित्याच्या वापरापासून सौदर्यं टिप्सचा वापर केला. परिणामही चांगला झाला असून, संसर्गांचा धोकाही नाही आणि पार्लरचा खर्चही वाचतो आहे.
रंजना साबळे, गृहिणी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.