Nagpur News - दहावी बारावीचे निकाल लागताच विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची लगबग सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांचा कल पारंपरिक अभ्यासक्रमाकडे असला तरी स्वतःचा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने अनेक विद्यार्थी आयटीआयकडे वळत आहेत.
यामध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त असून कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, बेसिक कॉस्मेटोलॉजी, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲण्ड सिस्टिम मेंटेनन्स या अभ्यासक्रमांचा आग्रह धरत आहेत.
खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी
ऑटोमोबाईल क्षेत्रात आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे. त्यामध्ये मारुती, महेंद्रा, टाटा, ह्युंडई तसेच इतर कंपन्याही आयटीआय विद्यार्थ्यांना प्राधान्य देतात. अनेक एनटीपीसी सारख्या संस्थांमध्येही करिअर करू शकतात.
स्वतःचे स्टार्टअप
आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रमातून स्टार्टअपबद्दल शिकवले जाते. त्यामुळे भविष्यात विद्यार्थांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध करून देता येतात.
सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी
भारतीय रेल्वे, भारतीय लष्कर, पीडब्ल्यूडी पाटबंधारे विभाग, तंत्रशिक्षण विभाग अशा सरकारी नोकऱ्यांमध्ये आयटीआय करणाऱ्या विद्यार्थांना संधी उपलब्ध आहेत.
फायदे
आयटीआयमधील अभ्यासक्रम कमी वेळेत पूर्ण होतो.
यात अनेक ट्रेड्स असून विद्यार्थ्यांना विविध पर्याय आहे.
खाजगी व प्रावेट सेक्टरमध्ये नोकरी उपलब्ध आहे.
सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा कोर्स आहे.
आयटीआयमध्ये मुलींचे
आवडते विषय
कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
बेसिक कॉस्मेटोलॉजी
इलेक्ट्रिशियन
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲण्ड सिस्टीम मेंटेनन्स
सध्या वाढत असलेल्या बेरोजगारी व नोकरीच्या कमी संधीमुळे अनेक विद्यार्थ्यांचा आयटीआय प्रवेशाकडे कल वाढत आहे. नोकरीसाठी आयटीआय उत्तम पर्याय असल्याने बहुतांश विद्यार्थिनी आयटीआयला पसंती देतात. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही नागपूर जिह्यात मुलींसाठी एकमेव शासकीय आयटीआय असून मुलींना कौशल्य प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध करुण देत आहे. मागच्या वर्षी कॅम्पस सिलेक्शनमध्ये अनेक विद्यार्थिनींना चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे.
-डी. एम. पुंड, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची) नागपूर.
इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा इतर शिक्षण घेण्याकरिता ४ वर्षांचा कालावधी लागतो. परंतु कमी वेळात शिक्षण पूर्ण करुण नोकरी करण्याचा कोर्स म्हणजे आयटीआय. त्यामुळे मला आयटीआय करायची इच्छा आहे.
-खुशी जांभूळकर, (विद्यार्थिनी)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.