Nagpur : सावधान! नागपूर शहरात डायरिया-गॅस्ट्रोचे ५८७ रुग्ण; बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी धोक्याचे महापालिकेचे आवाहन

Monsoon Health News In Marathi | पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित झाल्यास डायरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर, टायफॉईड, हगवण अशा आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो.
Beware 587 Diarrhea-Gastro patients in nagpur
नागपूर शहरात डायरिया-गॅस्ट्रोचे ५८७ रुग्णSakal
Updated on

Nagpur News : पावसाळ्यात जलजन्य आजारात वाढ झाली असून डायरिया आणि गॅस्ट्रोचे तब्बल ५८७ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. बोरवेलचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असून या काळात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित झाल्यास डायरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर, टायफॉईड, हगवण अशा आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माशा बसून, ते दूषित झाल्यास उलट्या, जुलाब, कावीळ अशा प्रकारचे आजार होतात. यावर्षी जानेवारीपासूनच जलजन्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत. यात डायरिया/गॅस्ट्रोच्या ५८७ रुग्ण आहेत. तर विषमज्वरचे ९० तर कावीळचे १४ रुग्ण आढळले आहेत.

शहरात वाढतेय रुग्ण संख्या

जानेवारी ते जुलै या काळात डायरिया, गॅस्ट्रोचे ५८७ रुग्ण आढळले आहेत. तर विषमज्वराच्या ९० तसेच कावीळच्या १४ रुग्णांची नोंद झाली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेच्या साथरोग प्रतिबंध विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

काय खबरदारी घ्यावी ?

बोरवेल शुद्धीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये. शिळे किंवा उघड्यावरचे माशा बसलेले अन्नपदार्थ खाऊ नये तसेच अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. हातगाड्यावर उघड्यावर विकले जाणारे खाद्य पदार्थ खाऊ नये.

पिण्याचे पाणी दूषित आढळल्यास त्यामध्ये क्लोरिन गोळ्यांचा वापर करावा, एक क्लोरिनची गोळी २० लीटर पाण्यामध्ये चुरा करून टाकावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

रुग्णांची माहिती मिळताच निवासी परिसरात गृहभेटी देऊन तसेच सर्वेक्षण, जनजागृती व पाणी नमुने तपासणी करण्यात येत आहे. या सोबतच गृहभेटीद्वारे रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचार व मार्गदर्शन करण्यात येत आहे.

- डॉ. गोवर्धन नवखरे, नोडल वैद्यकीय अधिकारी(साथरोग), महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.