Tanha Pola : भोसल्यांचा ‘नंदी’ झाला २१७ वर्षांचा; केवळ विदर्भ परिसरातच साजरा होतो तान्हा पोळा

बालगोपालांना बैलांचे महत्त्व कळावे याकरिता महाराजांनी तान्हा पोळा सणाची परंपरा नागपूरमध्ये सुरू केली
Tanha Pola
Tanha Polasakal
Updated on

नागपूर : दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी तान्हा पोळ्यासाठी तयार केलेल्या आठ फूट उंच आणि सहा फूट लांबीचा लाकडी नंदी यंदा २१७ वर्षांचा होणार आहे. बालगोपालांना बैलांचे महत्त्व कळावे याकरिता महाराजांनी तान्हा पोळा सणाची परंपरा नागपूरमध्ये सुरू केली होती. याकरिता या नंदीची निर्मिती केली होती.

राजे रघुजी महाराज भोसले यांनी मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा आयोजित करण्याची परंपरा नागपूरमध्ये सुरू केली. तेव्हापासून लहान मुले लाकडी नंदी बैलांचा पोळा साजरा करतात. विदर्भ वगळता कुठेच हा सण साजरा केला जात नाही.

सन १८०६ मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी हा उत्सव सुरू केला. महाराजांनी यांनी लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना वाटले. पोळ्याला उत्सवाचे स्वरुप देण्यासाठी आंब्याचे तोरण बांधले. त्याला जिलेबी, फळे, आता चॉकलेट, बिस्कीट पुडे बांधलीत.

Tanha Pola
Bail Pola Festival 2023: मोरकुरे येथील शेतकऱ्याने लाडक्या बैलजोडीचा केक कापून साजरा केला पोळा!

मुलांना उभे करून बैलांची पूजा केली. तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटप केले. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली.

राजे मुधोजी महाराज भोसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे. राजे मुधोजी महाराज यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी नंदी बैल आहे. महाल येथील सिनियर भोसला पॅलेस येथे तो ठोवण्यात आला आहे. या नंदीची उंची आठ फूट, लांबी सहा फूट असून या पायात चांदीचा तोडा घातला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.