टेकाडी (जि. नागपूर) : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पेंच जलाशयाच्या प्रवाहामुळे तालुक्याअंतर्गत कन्हान नदीला पूर आला असून अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे.अश्यात सकाळी रविवारला सकाळी ७:३० वाजता पेंच धरणाचे सोळा दारांपैकी चार दार बंद करण्यात आलेली होती.
सायंकाळ पर्यंत 12 दारांमधून दीड मीटरने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने दिवसभरात बऱ्यापैकी धोक्याच्या वक्र स्थानी असलेल्या गावांनी सुटकेचा श्वास घेतला होता परंतु सिंगारदीप गावाला नदीच्या पाण्याने घेरले असून गावातील काहीजणांना सुरक्षित ठिकाणी हलवलविण्याचे कार्य प्रशासना तर्फे करण्यात आले यात आमदार आशिष जयस्वाल यांनी खुद्द नौकेच्या आधाराने गावात जाऊन नागरिकांची भेट घेऊन धीर दिला.
गावांमधील अनेक घरे पाण्यात बुडाली असून अनेकांच्या शेतातील उभे पीक पाण्याने खराब झाले आहे.सिगारदीप गावात लाखोंच्या घरात लोकांचे नुकसान झाले असून भर पाण्यात नागरिकांची शनिवार रात्री पासून हाल होत होते अश्यात रविवारला सकाळ पासूनच नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढणे तर प्रशासनाकडून हेलिकॉप्टर च्या मदतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम प्रशासना तर्फे युद्ध पातळीवर करण्यात आले.
मंत्री सुनील केदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी देखील पूरग्रस्त भागांची पाहणी केली सोबत मदत कार्यास कमी पडता काम नये म्हणून प्रशासनाला सूचना दिल्या.तर कांद्री प्रभाग 1 येथील विजय राऊत,जनार्धन देव्हारे,विनोद फरकासे, रामदास सोनटक्के या चार कुटूंबाची घर पडली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झालेली आहे अश्यात प्रशासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
पारशिवनी तालुक्यातील पेंच धरणाचे १६ गेट उघडण्यात आले होते, पूर्ण गेट उघडण्यापूर्वी नदीशेजारील गावांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी ४ गेट खुले होते .दुपारी २ वाजता पूर्ण १६ दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पूर्ण गेट २ मीटरने उघडण्यात आले.
सायंकाळी ६.१५ वाजता ८ दरवाजे २ मीटरने तर इतर ८ दरवाजे २.५ मीटरने उघडण्यात आले. एकूण ३४४८.१६ क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता.नंतर चौराई धरण बंद केल्यानंतर राविवार सकाळी 16 दारांपैकी 4 दार बंद करून 6 मीटरने पाण्याचा निचरा सुरू होता सायंकाळी 6 वाजता तहसीलदार वरून सहारे यांनी दिलेल्या माहिती नुसार पेंच च्या 12 दारातून दीड मीटरने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.सध्या पुराच्या पाण्याची उतरण सुरू असून लवकरच सगळं पूर्ववंत होण्याची शक्यता प्रशासनाने दिली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.