किती हे प्रेम! चक्क कोंबड्याचा वाढदिवस केला साजरा

किती हे प्रेम! चक्क कोंबड्याचा वाढदिवस केला साजरा
Updated on

उमरेड (जि. नागपूर) : कोण काय करेल, याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये जेसीबीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कुणी कुत्र्याचा, मांजरीचा तर कुणी बैलाचा वाढदिवस साजरा केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, आता उमरेड शहरातील मंगळवारी पेठेतील कागदेलवर कुटुंबीयांनी चक्क कोंबड्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. वाढदिवसाची चित्रफीत प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली.

प्राणिमात्रांवर नव्हे तर वृक्ष, पर्वत, नद्या, सागरासह पंचमहाभूतांचे पूजन करण्याची शिकवण भारतीय संस्कृतीने दिली आहे. पाळीव प्राण्यांवर तर जिवापाड प्रेम केले जाते. संस्कृतीने रुजविलेल्या परोपकाराची जाणीव ठेवण्याच्या भावनेमुळेच भूतदयेची उदाहरणे आपल्या अवतीभोवती दिसून येतात. अशा घटनांना कुणी अंधश्रद्धा म्हणतील तर कुणी अज्ञानता. परंतु, प्रत्येक सजीवाला जीवन जगण्याचा अधिकार असल्याचे अशा घटनांमधून दिसून येते.

किती हे प्रेम! चक्क कोंबड्याचा वाढदिवस केला साजरा
महापालिका निवडणूक : भाजप खूश तर काँग्रेसला धक्का; प्रभाग तीनचा

उमरेड शहरातील मंगळवारी पेठेत राहणाऱ्या सुरभी कागदेलवार यांनी घरी कोंबड्याचा पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी कोंबड्याला औक्षण करून गोडधोड खाऊ घातले. वर्षभरापूर्वी हे कोंबड्याचे पिल्लू त्यांच्या दुकानासमोर फिरताना दिसले. कुत्रा किंवा मांजर या पिलाला खाऊन टाकतील या भीतीने कागदेलवार कुटुंबीयांनी त्याला घरी आणले. तेव्हापासून तो कुटुंबातील सदस्य झालाय.

सुरभीचे वडील रमाकांत कागदेलवार सांगतात, कोंबडा किंवा कोंबडी दिसली की मांसाहार करणाऱ्यांच्या मनात एकच विचार येतो, तो म्हणजे त्याला कापायचे आणि मस्तपैकी ताव मारायचे. मात्र, आम्ही शुद्ध शाकाहारी असल्यामुळे ‘कुचा’चे पालकत्व स्वीकारण्याचे ठरविले. वर्षभरापासून पोटच्या मुलाप्रमाणे आम्ही त्याचा सांभाळ करतो. दररोज सकाळी त्याला अंघोळ घालतो. वेगवेगळे पदार्थ खायला देतो. कुच्याला काजू फार आवडतात. शिवाय चहा-पोळी पण खातो. ‘कुचा’ आमच्या घरात आल्यापासून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही लोकांनी तो कोंबडा विकत घेण्याची इच्छा दर्शविली, मात्र आम्हाला त्याला विकायचे नसून शेवटपर्यंत संगोपन करायचे आहे.

पशू-पक्षी, प्राण्यांवर प्रेम करा

‘कुचा’ हा कोंबडा कागदेलवार कुटुंबीयांचा सदस्य आहे. तो घरातील प्रत्येकाचे ऐकतो. एवढंच काय तर ‘स्टेचू’ केल्यावर तो अजिबात हलत नाही. त्यामुळे या ‘कुचा’ने घरातील सर्वांना लळा लावलाय. त्याचा कागदेलवार कुटुंबीय आयुष्यभर सांभाळ करणार आहे. पशू-पक्षी आणि प्राण्यांवर प्रेम करा, त्यांच्यावर दया करा, हा संदेश कागदेलवार कुटुंबीयांनी यातून दिला.

किती हे प्रेम! चक्क कोंबड्याचा वाढदिवस केला साजरा
मुंबईच्या युवकाने भंडाऱ्यातील युवतीवर नागपुरात केला बलात्कार

म्हणून ठेवले ‘कुचा’ नाव

कोंबडा लहान असताना ‘कूच कूच, कूच कूच’ असा आवाज काढायचा म्हणून त्याचे नावे ‘कुचा’ ठेवण्यात आले. पोटच्या मुलाप्रमाणे कोंबड्याचा सांभाळ करतात. काल तो एक वर्षाचा झाला. त्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचे औक्षण करून गोडधोड खाऊ घालण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()