नागपूर : अवघ्या काही दिवसांवर विधान परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी सत्ताधारी असो किंवा विरोधक सर्वजण कामाला लागले आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) मिळवलेला विजय विरोधकासाठी धक्का देणारा ठरला. यात अपक्ष आमदारांची (independent MLA) भूमिका महत्त्वाची ठरली होती. याही निवडणुकीत भाजला चमत्काराची अपेक्षा आहे. यामुळेच अपक्ष आणि इतर पक्षातील आमदारांशी भाजपचा संपर्क सुरू असल्याचे भाजप नेते व आमदार परिणय फुके (parinay Fuke) यांनी सांगितले. (BJP is holding independent, contact with MLAs from other parties parinay Fuke)
नागपुरात आले असता फुके यांनी विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यसभा निवडणुकीनंतर भाजपचे लक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे. यामुळेच अपक्ष आमदार (independent MLA) आणि इतर पक्षातील आमदारांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपने जुळवाजुळव सुरू केली आहे, असेही फुके (parinay Fuke) म्हणाले.
मतांसाठी भाजप नेत्यांना जबाबदारी वाटून दिली आहे. या जबाबदारीअंतर्गत नेत्यांनी आमदारांसोबत संपर्क साधायला सुरुवात केली आहे. राज्यसभे प्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळेल असा विश्वासही परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे.
मतांसाठी भाजप नेत्यांना जबाबदारी वाटून दिली आहे. या जबाबदारीअंतर्गत नेत्यांनी आमदारांसोबत संपर्क साधायला सुरुवात केली आहे. मागील तीन दिवसांपासून भाजपचा (BJP) संपर्क सुरू झाला आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळेल असा विश्वासही परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे.
पाचही उमेदवार निवडून येतील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अपक्ष आमदार नाराज आहेत. याचाच लाभ घेण्यासाठी भाजप कामाला लागली आहे. याचा परिणाम सोमवारी (ता. २०) निकालाच्या दिवशी दिसणार आहे. निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही परिणय फुके (parinay Fuke) यांनी व्यक्त केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.