शिवसेनेला ठेवले वेटिंगवर अन् भाजप-राष्ट्रवादीचे उमेदवार संपर्कात?

शिवसेनेला ठेवले वेटिंगवर अन् भाजप-राष्ट्रवादीचे उमेदवार संपर्कात?
Updated on

नागपूर : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही इच्छुक उमेदवार संपर्कात असल्याने शिवसेनेने उमेदवारांच्या नावाची यादी आज सायंकाळपर्यंत जाहीर करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे दोन्ही काँग्रेस प्रतिसाद देत नसल्याने सेनेने जिल्हा परिषदेच्या सर्व १६ आणि पंचायत समितीच्या ३१ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (BJP-NCP-candidates-in-touch)

आघाडी कायम राहावी यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी शनिवारी सायंकाळपर्यंत वाट बघितली. तत्पूर्वी, शुक्रवारी काँग्रेससोबत चर्चेची बैठक निश्चित झाली होती. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी व्यस्त असल्याचे सांगून शिवसेनेला ताटकळत ठेवले. तेव्हाच सेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. काही सर्कलमधील भाजप आणि राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार संपर्कात असल्याने शिवसेनेने आपली यादी जाहीर करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला.

शिवसेनेला ठेवले वेटिंगवर अन् भाजप-राष्ट्रवादीचे उमेदवार संपर्कात?
राष्ट्रवादीला काँग्रेसकडून भीती; आघाडी तुटण्याची शक्यता

सोळापैकी १० जागा सेना निष्ठावंत आणि उर्वरित सहा जागांवर कुठल्याही पक्षाचा परंतु त्यांच्या सर्कलमध्ये लोकप्रिय तसेच सक्षम असलेल्या उमेदवाराला तिकीट देण्यात येणार असल्याचे समजते. वारंवार एकाच उमेदवाराला, तसेच नेत्यांच्या मागेपुढे फिरणाऱ्यालाच संधी दिली जात असल्याने भाजप व राष्ट्रवादीमध्ये अनेक कार्यकर्ते नाराज आहे. ते शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

शिवसेनेची काही पॉकेटमध्ये ताकद आहे. त्यात रामटेक, काटोल, नरखेड तालुक्याचा समावेश आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे. आजवर भाजप-शिवसेना एकत्रित लढत होती. यापुढे युती राहण्याची शक्यता नसल्याने शिवसेना जि.प. व पं.स. पोट निवडणुकीच्या माध्यमातून आपले जाळे अधिक घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहे.

(BJP-NCP-candidates-in-touch)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.