विदर्भात शिवसेना-भाजप आक्रमक; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

विदर्भात शिवसेना-भाजप आक्रमक; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
Updated on

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात विदर्भातील शिवसैनिक आक्रमक झाले. सकाळपासून त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करून नारायण राणे आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने करून राज्य सरकारचा निषेध केला. आंदोलनात शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.

अकोल्यात शिवसेनेच्या वतीने सकाळी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर राणे यांना अटक झाल्यानंतर त्याच चौकात सायंकाळी ५ वाजता भाजपच्या वतीने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे आमदार व जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत शिवसेनेने भाजपच्या विरोधात आंदोलन केले. नारायण राणेंच्या विरोधात शिवसेनेने वाशीम शहर पोलिसांत तक्रार दाखल करून पाटणी चौकात कोंबडी फेक आंदोलन केले. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत आंदोलकांना स्थानबद्ध केले.

विदर्भात शिवसेना-भाजप आक्रमक; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
नारायण राणेंची भाषा शिवसैनिकांसारखीच; तेव्हा कारवाई होत नाही

अमरावतीत भाजपच्या राजापेठस्थित कार्यालयावर हल्लाबोल करून शिवसैनिकांनी कार्यालयाबाहेरील पोस्टर्सची जाळपोळ केली. या घटनेनंतर भाजप व सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यामुळे दिवसभर शहरात तणावाचे वातावरण होते. याशिवाय नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आदी ठिकाणी आंदोलन करून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.

गडचिरोली, यवतमाळात रास्तारोको

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी येथे रास्तारोको करण्यात आला. आरमोरीत युवासेना व शिवसेनेच्या वतीने शेकडो शिवसैनिक व युवासैनिकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील शिवसेनेने या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आणि नारायण राणे यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहारे यांनी नारायण राणे यांच्यावर क्षुल्लक राजकारण करत असल्याचा जोरदार हल्ला चढवला. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी मार्गावर भाजपने रास्तारोको केला. यावेळी मार्गावर वाहतूक कोंडी झाली. कोणतीही अनूचित घटना घडू नये, यासाठी अवधूतवाडी पोलिसांनी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

विदर्भात शिवसेना-भाजप आक्रमक; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
मेडिकल : डॉक्टरकडून इंजिनिअरला मारहाण; छेड काढल्याचा गैरसमज

जशास तसे उत्तर देऊ

अकोला : लोकशाहीला काळिमा फासणारी कृती राज्यातील सरकारने केली. सरकारच्या पाठिंब्यानेच पोलिसांच्या आशीर्वादाने भाजप कार्यालयांवर हल्ले करण्यात आले. यापुढे भाजप कार्यालयात कुणी आल्यास त्याला जशास तसे उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी मंगळवारी अकोला येथे दिली. त्यांच्या उपस्थितीत भाजपचे आमदार व लोकप्रतिनिधी यांनी अकोल्यात नारायण राणे यांच्या अटकेला निषेध करण्यात आला. राणे यांना अटक करून सरकारने लोकशाहीला काळिमा फासला. या घटनेचा निषेध करीत असून, राणे यांची सरकारने लवकर सुटका करावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, भाजप महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, भाजयुमोचे पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.