Nagpur : १०८ माजी नगरसेवकांवर भाजपची करडी नजर; कामगिरीवरच होणार महानगरपालिकेचे तिकीट पक्के

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवडून आणण्यासाठी भाजपने बुथनिहाय काटेकोर नियोजन केले असून १०८ माजी नगरसेवकांनाही कामाला लावले आहे.
१०८ माजी नगरसेवकांवर भाजपची करडी नजर
१०८ माजी नगरसेवकांवर भाजपची करडी नजरSakal
Updated on

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवडून आणण्यासाठी भाजपने बुथनिहाय काटेकोर नियोजन केले असून १०८ माजी नगरसेवकांनाही कामाला लावले आहे. ते रोज काय करतात, कुठे जातात, कशा पद्धतीने प्रचार करीत आहेत याचा लेखाजोखा ठेवला जात आहे.

महापालिकेची निवडणूक लोकसभेनंतरच होणार आहे. त्यामुळे सर्वच इच्छुकांचे भवितव्य गडकरी यांना कोण किती मताधिक्य मिळवून देते यावर राहणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने विक्रमी यश मिळवले होते. तब्बल १०८ नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. काँग्रेसचे फक्त २९ नगरसेवक जिंकले होते.

या निवडणुकीत काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांचा पराभव झाला होता हे विशेष. निवडणुकीनंतर काँग्रेसच्या २९ नगरसेवकांमध्येही दोन गट पडले होते. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांचे कट्टर समर्थक संजय महाकाळकर यांना महापालिकेचे पक्षनेते करण्यात आले होते.

मात्र विरोधकांनी वेगळा गट स्थापन करून त्यांची सत्ता उलथावून लावली होती. त्यांच्याऐवजी तानाजी वनवे यांना गटनेते करण्यात आले होते. वनवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्यासह सुमारे १८ नगरसेवक त्यावेळी ठाकरे यांच्या विरोधात एकत्र आले होते.

पाच वर्षे एकमेकांसोबत भांडणारे नगरसेवक सध्या विकास ठाकरे यांचा प्रचार करीत असल्याचे दिसत आहेत. याचे कारण म्हणजे असंतुष्ट नगरसेवकांचे नेते माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार एकत्र आले आहेत.

त्यामुळे ठाकरे विरोधक नगरसेवकांचाही नाईलाज झाला आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो याची जाणीव या नगरसेवकांना आता झाली आहे.भाजपकडे १०८ नगरसेवकांची फौज आहे. यापैकी अनेकांना पुन्हा निवडणूक लढायची आहे. सुमारे दोन वर्षांपासून महापालिकेचा कार्यकाळ संपला आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्यावरून महापालिकेच्या निवडणुकीवर स्थगिती आहे. हे बघता लोकसभेनंतरच महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला आपली कामगिरी दाखवावी लागणार आहे. काही नवे इच्छुकही कामाला लागले आहेत.

मागील निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी प्रवीण दटके आता आमदार झाले आहेत. महापौर झालेले संदीप जोशी यांनी महापालिकेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे. बंटी कुकडे शहराचे अध्यक्ष झाले आहेत. काही नगरसेवकांना आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या माध्यमातून एक नवी पिढी महापालिकेच्या राजकारणात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()