Crime News : पुस्तक विक्रेत्याची ७६ लाखांनी फसवणूक; जीवे मारण्याची धमकी

मुंबईच्या व्यावसायिकांसह भागीदारांविरोधात गुन्हा दाखल
Crime News
Crime Newsesakal
Updated on

नागपूर ः शालेय पुस्तके खरेदीचे ७६ लाख रुपये न देता जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुंबईतील व्यावसायिकांसह त्यांच्या भागीदारांविरोधात पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पंकजसिंग जीतसिंग (वय ४९, रा. साई सेवाश्रम सोसायटी, हजारीपहाड) यांनी तक्रार दिली होती.

Crime News
Nashik Crime News : वृद्धेचा मारेकरी पोलिसांच्या हाती लागेना! शोध पथके रिकाम्या हाती परतली

चिराग काशीनाथ डे (रा. भोईसर, मुंबई), दीपक शिवशंकर मोर्य (रा. नालासोपारा, वसई, पालघर, मुंबई) अशी आरोपींची नाव आहेत. त्यांचे बालाजी बुक एजेन्सी नावाने दुकान आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजसिंग यांचे लहान बंधू शैलेश जीतसिंग (वय ४८) यांच्या नावाने शैल्स इंटरनॅशनल नावाने कंपनी आहे. या कंपनीची संपूर्ण जबाबदारी पंकजसिंग सांभाळतात. कंपनीच्या माध्यमातून शहरातील शाळांना गेल्या दहा वर्षांपासून पुस्तकांचा पुरवठा केला जातो. दरम्यान मुंबईतील चिराग डे आणि दीपक मोर्य यांनी ३१ मार्चला त्यांची भेट घेऊन त्यांना ७६ लाख ६८ हजार रुपयांच्या पुस्तकांची मागणी केली. त्यानुसार लेखी करारनामा करीत १ जूनपर्यंत पंकजसिंग यांनी पुस्तके त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर पाठविले. त्यासाठी त्यांनी आगाऊ रक्कम म्हणून त्यांच्या खात्यात एक लाख रुपये टाकले. याशिवाय ९० दिवसांत उर्वरित रक्कम देण्याची बतावणी केली.

मात्र, त्यानंतर त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. शिवाय फोनवरही प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन बघीतले असता, ते बंद असल्याचे आढळले. आधारकार्डवर दिलेल्या पत्त्यावर तिथे राहत नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे चिराग यांचे भागीदार दीपक मोर्य यांच्याशी व्यवस्थापकाने संपर्क केला असता, त्यांनी चिराग हे भागीदार नसल्याचे सांगितले. याशिवाय तुम्ही माझे काहीही बिघडवू शकत नसल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत, तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.