नागपूर : तीन हजार नागरिकांना देण्यात आला ‘बुस्टर डोज’

पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद ; आरोग्यसेवक, ६० वर्षांवरील नागरिकांचा समावेश
Corona Booster Dose News
Corona Booster Dose Newssakal
Updated on

नागपूर : तिसऱ्या लाटेचा (third wave of corona)धोका बघता आजपासून सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत जिल्ह्यात दोन हजार ९४५ जणांनी बूस्टर डोस घेतला. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (minister dr. nitin raut)यांनी डोस घेऊन मोहिमेला सुरुवात केली. आरोग्य सेवकांच्या गटातून महापालिकेचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपंकर भिवगडे यांनी पहिला बूस्टर डोस(booster dose) घेतला. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा, शहरात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स(frontline workers) आणि ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या विविधी व्याधी असलेल्या व्यक्तींना आजपासून बुस्टर डोस देण्यास प्रारंभ झाला. पाचपावली स्त्री रुग्णायालयात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि महापौर दयाशंकर तिवारी(mayor dayashankar tiwari) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेला सुरुवात झाली.

Corona Booster Dose News
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 जानेवारी 2022

या वेळी जिल्हाधिकारी आर. विमला, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, राम जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक आयुक्त अभिजीत बावीस्कर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते. पाचपावली केंद्रावर सकाळपासून बुस्टर डोज देण्यासाठी ६० वर्षावरील नागरिकांची आणि आरोग्य सेवक तसेच फ्रंटलाईन वर्कर्सची रांग लागली होती. सगळ्या केंद्रांमध्ये या प्रकारची रांग दिसून येत होती. दुसरा डोस घेतल्यापासून नऊ महिने झालेल्यांंनाच बूस्टर डोस घेण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच बूस्टर डोस घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

शहरात १९८५ जणांनी घेतला डोस

महानगर पालिकेतर्फे शहरात ११९ स्थायी केंद्रात कोविशिल्ड आणि २९ स्थायी केंद्रात कोवॅक्सिनची लस देण्यात येत आहे. आज पहिल्या दिवशी शहरातील १ हजार ९८५ नागरिकांनी बूस्टर डोस घेत प्रतिसाद दिला.

Corona Booster Dose News
नागपूर : कोरोनाग्रस्त वाढताच गृहविलगीकरण सुरू

कोरोनापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आता बुस्टर डोजची आवश्यकता आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशाप्रमाणे पात्र नागरिकांनी बुस्टर डोज घेणे गरजेचे आहे.

- डॉ. नितीन राऊत,पालकमंत्री.

Corona Booster Dose News
तर्री-पोहे फेमस करणारे रूपम साखरे यांचे निधन

नागरिकांना नि:शुल्क बूस्टर डोस दिला जात आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्यात यावा. याशिवाय १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी, तरुणांनीही पहिला डोस घेण्यास पुढाकार घ्यावा.

- दयाशंकर तिवारी,महापौर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()