सहायक पोलिस उपनिरीक्षक देवासमोरच लाच घेतो तेव्हा...

bribe crime
bribe crimesakal media
Updated on

कळमेश्वर (जि. नागपूर) : आपल्या हातून चुकीचे कृत्य होऊ नये म्हणून नागरिक देवासमोर शपथ घेतात. देवाचा धाक असल्याने त्याच्या पुढे बोललेले किंवा दिलेले वचन पाळले जाते. देवाच्या दारात चुकीचे किंवा अपकृत्य टाळले जाते. मात्र, नागपूर ग्रामीण पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षकाने चक्क देवासमोरच लाच घेतली. लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली आहे.

जयप्रकाश शिवनारायण शर्मा (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. तो नागपूर ग्रामीण पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मद्यविक्रेत्याकडून दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. तक्रारदार हा कळमेश्वर येथील रहिवासी असून त्याचा येथे बिअर बार आहे.

bribe crime
धोका वाढला! गडचिरोली जिल्ह्यात ६ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद

तक्रारदार दारूची ‘होम डिलीवरी’ करण्याची सुविधा देतो. त्यावरून सहायक पोलिस उपनिरीक्षक जयप्रकाश शिवनारायण शर्मा यांनी बारचालकाला प्रत्यक्ष भेटून त्रास ‘तुला मी १० ते ११ च्या दरम्यान दारूची ‘होम डिलीव्हरी’ करताना वेगवेगळ्या कारणांवरून केस करू शकतो. त्यासाठी मला महिन्याचे ६,००० रुपये हप्ता द्यावा लागेल’, अशी मागणी केली़. मात्र, बारमालकाला ती रक्कम द्यायची नसल्याने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली.

यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली. पडताळणीमध्ये शर्मा यांनी बारमालकाला ‘होम डिलीव्हरी’ करताना वेगवेगळ्या कारणावरून केस करू नये, म्हणून प्रतिमहिना ६,००० रुपये व गेल्या महिन्याचे व चालू महिन्याचे अशा एकूण १२,००० लाचेची मागणी करून तडजोडीअंती १०,००० हजाराची लाच फेटरी येथील हनुमान मंदिरासमोर स्वीकारताच अटक केली़. याप्रकरणी कळमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()