नवरी म्हणे नवरदेवाला, आधी मास्क बांधू तोंडाला !

मांढळ ः नवदाम्पत्याला सॅनिटायझरची बॉटल सप्रेम भेट देताना उपसरपंच सुरेश नौकरकर.
मांढळ ः नवदाम्पत्याला सॅनिटायझरची बॉटल सप्रेम भेट देताना उपसरपंच सुरेश नौकरकर.
Updated on

कुही (जि.नागपूर) : लग्नात कोण कशावरून रूसून बसेल हे सांगता येत नाही. कारण अशा अडचणीच्या वेळी आपली मागणी पूर्ण करण्याचीच ही एकमेव संधी असते. पण या वधुने मात्र एका सामाजिक उपक्रमातून चक्‍क मास्क बांधूनच लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची नवरदेवासमोर ठेवली. नवरदेवाने लाडक्‍या वधुची मागणी क्षणाचाही विलंब न करता मान्य केली, हेही नसे थोडके.

आईवडिलांच्या साक्षीने घरातच उरकला लग्नविधी
उमरेड कऱ्हांडला अभयारण्यालगत असलेल्या डोंगरमौदा येथील वधू पूजा खोंडे व मांढळ येथील संदीप लुचे यांनी फक्त आईवडिलांच्याच उपस्थित सोशल डिस्टन्सिंग वगैरे शासनाचे आदेश पाळत मास्क बांधून घरातच लग्नविधी आटोपून एका नवीन जीवनाला सुरुवात केली. नवरी पूजा हिने भावी जीवनासाठी मास्क तोंडाला बांधल्यानंतरच मी पती म्हणून तुमचा स्वीकार करेन, अशी अट घातली. नवरदेवाने तात्काळ ही अट मंजूर केली. नवरी नवरदेवाने मास्क घालून पाच
मिनिटातच लग्नविधी आटोपला.

नियमांचे काटेकोर पालन
विशेष म्हणजे सध्या संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. नागपूर जिल्हा "रेड झोन'मध्ये आहे. लॉकडाउन कधी उघडेल हे आज तरी कुणीच सांगू शकत नाही. या पार्श्वभूमीवर या सुज्ञ नवदाम्पत्याने निर्णय घेतला की, शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत घरातच लग्नविधी उरकून घेतला. त्यामुळे डोंगरमौदा येथील उपसरपंच सुरेश नौकरकर यांनी या जोडप्याचे कौतुक केले व नवरी व नवरदेवाला सॅनिटायझरची बॉटल सप्रेम भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.