मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो

मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो
Updated on

उमरेड (जि. नागपूर) : दिवस रविवार... १५ ऑगस्ट... सरकारी सुटी असल्याने उमरेड शहरातील मोहपा रोड येथील रहिवासी मंगेश मधुकर जुनघरे (वय ३५) व विनोद ऊर्फ लल्ला मधुकर जुनघरे (वय ३१) हे दोघे भाऊ मित्रांसह भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याच्या गोसे धरणावर फिरायला गेले. वैनगंगेच्या काठावर लहान भावाचा तोल गेला. पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना मोठ्या भावाने वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. दोघेही प्राण वाचविण्यात अपयशी ठरल्याने मृत्यू झाला. ही बातमी समजताच मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी एकच टाहो फोडला...

मंगेश व विनोदच्या जाण्याने आई-वडिलांचे राम व लक्ष्मण गेले. मंगेशचा चार वर्षांचा मुलगा साऱ्यांना रडताना पाहून भांबावल्या स्थितीत हंबरडा फोडत होता. तर पत्नी पती गेल्याच्या धक्क्याने धाय मोकलून रडत होती. दुसरीकडे विनोदची पत्नी दहा महिन्यांच्या लेकीला घेऊन टाहो फोडत होती. एकूणच साऱ्यांना रडताना पाहून अंगणात जमलेल्या मंडळींच्या डोळ्यात दुखश्रु वाहत होते.

मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो
यवतमाळातील हेलिकॉप्टर अपघातावर कॅप्टन अमोल यादव म्हणाले...

मंगेश हा वडिलांच्या शेतीत लक्ष देऊन हिरव्या स्वप्नांची लागवड करायचा. विनोद हा अभियंता असून, पुण्याचा खासगी नामांकित कंपनीत नोकरी करायचा. तसा तो लहान असल्याने घरात सर्वांचा लाडका होता. दोन वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याला १० महिन्यांची लेक आहे. वर्क फ्रॉम होम असल्याने तो घरूनच काम करायचा. नियतीने निर्माण केलेल्या दुर्दैवी परिस्थितीने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.

चार तासांच्या अंतरांनी सापडले दोन्ही मृतदेह

दोन भाऊ पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व शोधमोहीम हाती घेतली. परंतु, सायंकाळ झाल्याने शोधकार्य थांबवावे लागले. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी शोधमोहीम राबविली असता ९ वाजताच्या दरम्यान मंगेशचा मृतदेह आढळला. तर दुपारी १ वाजता विनोदचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले.

मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो
राज्यात भाजीपाला निर्यात नोंदणीत विदर्भ अव्वल

जड अंतःकरणाने दिला निरोप

पोलिसांनी दोन्ही मृतदेह पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन प्रक्रिया आटोपून सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास उमरेडला राहत्या घरी पोहोचले. जड अंतःकरणाने दोघांच्या अंत्ययात्रेची तयारी घरी सुरू झाली होती. आप्तजन, शेजारी, गावकरी मोठ्या संख्येने अंतिम दर्शन घेण्यासाठी एकवटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.