Bus Free Pass : वाहकांची वाढली डोकेदुखी! बसच्या मोफत प्रवासासाठी ज्येष्ठांची ‘बनावट’ शक्कल

महाराष्ट्र सरकारने वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्यांना एसटीत मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेंतर्गत ही सवलत दिली जाते.
Old People
Old Peoplesakal
Updated on

- अखिलेश गणवीर

नागपूर - महाराष्ट्र सरकारने वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्यांना एसटीत मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेंतर्गत ही सवलत दिली जाते. मात्र, सवलत मिळविण्यासाठी वय कमी पडत असल्यास आधार कार्ड अपडेट करून लाभ घेण्याचे प्रकार उघडकीस येत असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे.

वयाची ७५ वर्षे ओलांडणाऱ्यांना मोफत तर ६५ वर्षे पूर्ण केलेल्यांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. सरकारच्या या योजनेमुळे एसटीमध्ये ज्येष्ठांची गर्दी चांगलीच वाढली असून, बसायलाही जागा मिळत नसल्याची स्थिती आहे. वय कमी पडत असल्यास या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आधार अपडेटचा जुगाड करीत असल्याचे उघडकीस येत आहे.

ज्येष्ठांची बनावट शक्कल वाहकांच्या लक्षात येते. काही वाहकांनी ‘सकाळ’ प्रतिनिधीकडे असेच आधार कार्ड पाठवले. जी व्यक्ती ४५ ते ५० वर्षे वयाची दिसते त्या आधार कार्डवर वय ७८ दाखवले आहे. जन्मतारखेशी छेडछाड करून हा प्रकार केला जात असल्याचे वाहकांकडून सांगण्यात आले. मात्र, ज्येष्ठांसोबत वाद घालणार कोण? म्हणून नाइलाजाने त्यांना मोफत प्रवासाचे तिकीट दिले जात असल्याचे वाहकांचे म्हणणे आहे.

मात्र, काही वाहक आधार कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करून ज्येष्ठांची ही बनवाबनवी उघडकीस आणतात. नागपूर विभागात आठही आगार मिळून मार्च महिन्यात २ लाख ८६ हजार ९८४ ज्येष्ठांनी प्रवास केला. एप्रिलमध्ये २ लाख ९२ हजार ७६९ आणि मे महिन्यात २ लाख ८२ हजार ९० ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. ५० टक्के सवलतीत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांकडून एसटीला तीनही महिन्यात जवळपास ४ कोटींचे उत्पन्न झाले.

मोफत प्रवासासाठी ज्येष्ठांची ‘बनावट’ शक्कल

वाहकांकडून सांगण्यात आले. मात्र, ज्येष्ठांसोबत वाद घालणार कोण? म्हणून नाइलाजाने त्यांना मोफत प्रवासाचे तिकीट दिले जात असल्याचे वाहकांचे म्हणणे आहे. मात्र, काही वाहक आधार कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करून ज्येष्ठांची ही बनवाबनवी उघडकीस आणतात.

प्रवासी ज्येष्ठांची संख्या वाढली

नागपूर विभागात आठही आगार मिळून मार्च महिन्यात २ लाख ८६ हजार ९८४ ज्येष्ठांनी प्रवास केला. एप्रिलमध्ये २ लाख ९२ हजार ७६९ आणि मे महिन्यात २ लाख ८२ हजार ९० ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. ५० टक्के सवलतीत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांकडून एसटीला तीनही महिन्यात जवळपास ४ कोटींचे उत्पन्न झाले.

बोगस आधार कार्डची तपासणी केली जात आहे. वाहकांकडे स्कॅनरची सुविधा उपलब्ध आहे. बुलढाण्यामध्ये बोगस आधार कार्ड दाखवून प्रवास करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूर विभागात गुन्हा दाखल झाला नसला तरी आम्ही याबाबत खबरदारी घेत आहोत.

- श्रीकांत गभने, उपमहाव्यवस्थापक- नागपूर व अमरावती प्रादेशिक विभाग (एसटी महामंडळ)

या मार्गावर सर्वात जास्त प्रकार

नागपूर-अमरावती, नागपूर-वरुड, नागपूर-कोंढाळी, नागपूर-कारंजा या मार्गावर असे प्रकार उघडकीस येत असल्याचे वाहकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. एसटी महामंडळाकडे आधार कार्ड ओळखण्याचे यंत्र नसल्याचेही काही वाहकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.