शाळाच सुरू नाहीत तर साहित्य विकत घेणार कोण? स्टेशनरी व्यावसायिकांचा सवाल.. कोरोनाचा फटका

Business of stationary store owners are down due to corona
Business of stationary store owners are down due to corona
Updated on

नागपूर : जून महिन्यात दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होते. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस बाजारपेठेत शालेय साहित्य आलेले असते. परंतु यंदा लॉकडाऊनमुळे जुलै महिना संपुनही शालेय साहित्याची बाजारपेठ सुरू झालेली नाही त्यामुळे स्टेशनरी व्यावसायिकांना लाखोंचा फटका बसला आहे.

शाळा सुरू होण्याबाबत अजूनही काही निश्चीत नसल्याने, शालेय साहित्य खरेदी-विक्रीचा व्यवसायच पूर्णपणे ठप्प झाला आहे. शालेय साहित्य विक्रीची बाजारपेठही ओस पडली आहे.लॉकडाऊन असल्याने नागपुरात इतवारी, महाल, गांधीबाग येथील होलसेल शालेय साहित्याची बाजारपेठ आहे. येथील अनेक दुकानांत शालेय साहित्य विक्रीस असते. लहान मुलांची दप्तरे, सॅक, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स, नकाशा व अन्य साहित्य येथूनच खरेदी करण्यासाठी दरवर्षी पालकांची गर्दी होते. 

परंतु यंदाच्या वर्षी काहीच हालचाल नाही. शैक्षणिक वर्ष सुरू केव्हा होणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. नर्सरी पहिलीपासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची गरज असते. परंतु यंदा मात्र काहीच हालचाल नसल्याने विक्रेते हातावर हात ठेवून बसले आहेत.

देशभरातील स्टेशनरी व्यवसाय ठप्प

कोरोना महारोगराईमुळे शाळा बंद असल्याने स्टेशनरी व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे देशभरातील स्टेशनरी व्यापाऱ्यांचा सुमारे १,६०० कोटी रुपयांचा माल गोदामांत पडून आहे. एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने स्टेशनरी व्यापाऱ्यांचा सीझन असतो. या दरम्यान दरवर्षी ४,००० कोटी रुपयांचा व्यवसाय करत होते. त्याची वार्षिक उलाढालीत ५०% हिस्सेदारी होती. मात्र, कोरोनामुळे या वर्षी या तीन महिन्यांत ४०० कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय पोहोचण्याचा अंदाज आहे.

व्यवसाय थंडच आहे
गेल्या आठ वर्षापासून नागपूरमध्ये बुकडेपो आणि शालेय साहित्याचा व्यवसाय करतो. मे नंतर, जून, जुलै हा महिना म्हणजे आमच्यासाठी वर्षभरातील ७० टक्के व्यवसायाचा असतो. यंदा मात्र ऑगस्ट महिना आला तरी, व्यवसाय थंडच आहे. मुलांना मोबाईलवरच अभ्यास करायचा असल्याने, शालेय साहित्याची फारशी आवश्यकता भासत नसल्याने आमचे सर्व साहित्य तसेच पडून आहे.
श्रीकांत धवड, 
स्टेशनरी व्यावसायिक, नागपूर. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.