नागपूर : ‘बाबा, मी गरिबांसाठी काही करू शकलो नाही’, अशी सुसाइड नोट लिहून चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या (suicide news) केली. लोकेश दिलीप हुमे (२४) असे मृताचे नाव आहे. लोकेश मूळचा भंडारा जिल्ह्याच्या पवनीचा रहिवासी आहे. सीए बनण्यासाठी तो नागपुरात आला (Nagpur crime news) होता. वडिलांनी त्याला काही कमी पडू दिले नाही. (CA-student-commits-suicide-in-Nagpur)
घरची परिस्थिती जेमतेम असताना त्याला सीए बनविण्यासाठी आर्थिक आणि मानसिक सपोर्ट केला. परंतु, दीड वर्षापासून सततच्या लॉकडाउनमुळे घरची परिस्थिती खालावली. मोठे होऊन गरिबांसाठी काही करण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, गरिबांसाठी याची शाश्वती राहिली नाही. ज्या उद्देशाने नागपुरात शिकण्यासाठी आला ते पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाल्याने तो मनाने खचला होता.
नंदनवन हद्दीतील रमणा मारुतीनगरच्या प्लॉट नंबर १६४ येथे तो किरायाने खोली करून राहत होता. दोन दिवसांपूर्वीच त्याने वडिलांना कॉल करून हताशपणा व्यक्त केला होता. त्यावेळी वडिलांनी त्याला धीर दिला. हेही दिवस निघून जातील, असे त्यांनी म्हटले. तेव्हा तो त्यातून सावरला. परंतु, ५ जून रोजी ५ वाजतापूर्वी त्याने स्वतःच्या खोलीत छताला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
हा प्रकार घरमालक मोहन मुरलीधर तरटे (४५) यांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती नंदनवन पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलला पाठविला. पोलिसांना मृतदेहाशेजारी त्याने लिहिलेली सुसाइड नोट सापडली. यात त्याने वडिलांना उद्देशून गरिबांची कोणत्याही प्रकारची मदत करू शकलो नसल्याची खंत व्यक्त केली होती. आपल्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे आणि बाबांना किरायाचे पैसे देऊन टाका, असे लिहिले आहे.
अभ्यासात होता हुशार
लोकेश अभ्यासात हुशार होता. परंतु, तो मानसिकरित्या खचला होता. लॉकडाउनकाळात त्याला मानसिक आधार मिळाला नव्हता. गरिबांसाठी आपण काही करू शकू की नाही, मग शिक्षणाचा काय अर्थ? हा विचार त्याला आतून खात होता. अखेर त्याने निराशेतून गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
(CA-student-commits-suicide-in-Nagpur)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.