Police Case : महिलेला अश्लील मेसेज पाठवणं उपसरपंचाला पडलं महागात; 'तो' मेसेज चांगलाच आला अंगलट

धर्मय्या वडलाकोंडा हा नेहमी पीडित महिलेच्या घरी जायचा. शिवाय, तिच्याशी फोनवर अश्लील संभाषण करून तिला अश्लील मेसेजही पाठवायचा.
Police Case
Police Caseesakal
Updated on
Summary

या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने फिर्यादी व साक्षदारांचा पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी धर्मय्या वडलाकोंडा याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

गडचिरोली : गावातील एका महिलेशी नेहमी फोनवर अश्लील बोलून तिला मेसेज पाठविण्याचा प्रकार एका उपसरपंचाच्या चांगलाच अंगलट आला असून अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. धर्मय्या किष्टय्या वडलाकोंडा (वय ४३), रा. असरअली, ता. सिरोंचा असे या आरोपी उपसरपंचाचे नाव आहे.

धर्मय्या वडलाकोंडा हा नेहमी पीडित महिलेच्या घरी जायचा. शिवाय, तिच्याशी फोनवर अश्लील संभाषण करून तिला अश्लील मेसेजही पाठवायचा. धर्मय्याच्या या कृत्यांनी त्रस्त झालेल्या महिलेने याबद्दल आपल्या पतीला सांगितले. त्यानंतर पतीने धर्मय्याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. मात्र, धर्मय्याने शिवीगाळ करुन 'तुला काय करायचे ते करुन घे', असे उलट प्रत्युत्तर देत धमकावले.

Police Case
Gadchiroli Maoists : देवेंद्र फडणवीसांपुढे आत्मसमर्पण करणारा गिरीधर 'पळपुटा'; पत्रकातून माओवाद्यांची आगपाखड

त्यानंतर धर्मय्याच्या पत्नीने पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्या पतीला पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित महिलेने धर्मय्याविरुद्ध कायदेशिर तक्रार केली. त्यानुसार असरअली पोलिसांनी संशयित आरोपी धर्मय्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी पवार व गजानन राठोड यांनी अहेरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात संशयीत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.

Police Case
Kolhapur Police : हेअरस्टाईलवर कात्री फिरवून पोलिसांनी जिरवली मस्ती; रिल्सची खुमखुमी आली अंगलट

या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने फिर्यादी व साक्षदारांचा पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी धर्मय्या वडलाकोंडा याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. शिवाय, यापुढील तीन वर्षे असे कृत्य करणार नाही, असे हमीपत्रही लिहून घेतले. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.