Nagpur News : भूमाफियांविरोधातील नऊ प्रकरणात गुन्हे दाखल

२१ प्रकरण प्रक्रियेत ः पोलिस आयुक्तांच्या दरबारी २७५ तक्रारी
Nagpur News
Nagpur Newsesakal
Updated on

नागपूर ः गेल्या काही वर्षांमध्ये शहरात भूमाफिया सक्रीय झाले असून त्यांच्या माध्यमातून जमिनी बळकावणे, अतिक्रमण करणे आणि बनावट दस्तऐवजांच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केल्या जाते. अशा फसवणूक होणाऱ्या २७५ नागरिकांनी दस्तऐवजासोबत पोलिस आयुक्तांच्या जनता दरबारात भेट देत गाऱ्हाणे मांडले. त्यापैकी ९ तक्रारीवर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून २१ प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली.

Nagpur News
Nashik Accident News : आयशर चालकाच्या वैदयकीय चाचणी अहवालाची प्रतिक्षा

शहरात सातत्याने भूमाफियांचा वावर वाढल्याने ठाण्यात त्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात येतात. मात्र, अनेकदा त्या तक्रारीवर निश्‍चित कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे अनेकजण न्यायापासून वंचित राहतात. अशा वंचित नागरिकांसाठी पोलिस आयुक्तांनी सोमवारी (ता.१५) सकाळी अकरा वाजतापासून जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी पोलिस सहआयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त पोलिस (गुन्हे) आयुक्त संजय पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण विभाग) शिवाजी राठोड, पोलिस उपायुक्त (गुन्हे) निमित गोयल यांच्यासह सर्व शाखेच्या परिमंडळातील उपायुक्तांचे वाचक आणि पोलिस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले होते.

Nagpur News
Nashik Crime News : तोडफोड करणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळल्या; शहर गुन्हेशाखेच्या गुंडा पथकाकडून अटक!

जनता दरबारात शहरातील पाचही परिमंडळातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २७५ नागरिकांनी तक्रारी नोंदविण्यात आल्यात. त्यामध्ये जवळपास ९ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय २१ प्रकरणात प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, अनेक तक्रारीमध्ये पोलिसांकडून तपास करण्यात आला असल्याची माहिती समोर आली तर काही प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचेही दिसून आल्याचीही माहिती त्यांनी दिली.

Nagpur News
Mumbai Rain News: मुसळधार पावसामुळे अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद

परिमंडळ चारमध्ये सर्वाधिक तक्रारी

पोलिस आयुक्तांच्या जनता दरबारात परिमंडळ १ ते ५ मधील तक्रारदारांची चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वाधिक १०६ तक्रारी या परिमंडळ चारमधून आल्याचे दिसून आले. वाठोडा, अजनी, हुडकेश्‍वर, नंदनवन आणि बेलतरोडी यासारख्या पोलिस ठाण्याचा समावेश आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात भूखंडाची प्रकरणे असल्याने तिथे भूमाफीया सक्रीय आहे. याशिवाय परिमंडळ तीनमध्ये सर्वात कमी १७ तक्रारी आल्याचे दिसले. यावेळी ३० जणांच्या अर्जावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचेही आदेश पोलिस आयुक्तांनी दिले.

Nagpur News
Nashik Crime News : वृद्धेचा मारेकरी पोलिसांच्या हाती लागेना! शोध पथके रिकाम्या हाती परतली

आयुक्त घेणार आढावा

पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या जनता दरबारात भूमाफियांविरोधात तक्रारींचा पाऊस पडल्याचे दिसून आले. यावेळी या तक्रारीवरून पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले. मात्र, आता या आदेशानंतर त्या प्रकरणात पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली त्याचा आढावा पोलिस आयुक्त महिन्याभरात घेणार आहेत. त्याप्रमाणे कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचेही संकेत त्यांनी दिले.

अशा आहेत तक्रारी

परिमंडळ - १ - ३२

परिमंडळ - २ - ६३

परिमंडळ - ३ - १७

परिमंडळ - ४ - १०६

परिमंडळ - ५ - ३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.