Narendra Modi : राज्यातील सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू; नरेंद्र मोदी यांनी केले विविध विकासकामांचे ऑनलाइन उद्‌घाटन

‘देशात पायाभूत विकासाच्या सर्व क्षेत्रांसमवेत आपण सर्वसामान्यांचे आरोग्य, शेती, शेतकरी आणि पशुपालकांसाठी विकासाचे नवे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.
Narendra Modi
Narendra Modisakal
Updated on

नागपूर - ‘देशात पायाभूत विकासाच्या सर्व क्षेत्रांसमवेत आपण सर्वसामान्यांचे आरोग्य, शेती, शेतकरी आणि पशुपालकांसाठी विकासाचे नवे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. भारतातील कंटेनरचे सर्वांत मोठे वाढवण बंदर साकारत आहोत. या सर्व विकासाचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आपण ठेवला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व इतर प्रकल्पांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रत्यक्ष तर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

मोदी म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या दहा वर्षांपासून सुरु केलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून पायाभूत सेवा सुविधांसह विकासाचे नवे समृद्ध मार्ग खुले झाले आहेत. आज महाराष्ट्रातील दहा वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रारंभ होत आहे. विदर्भाच्या एकात्मिक विकासाला चालना देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास कामांची पायाभरणी होत आहे.

शिर्डी विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स, मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्राचा प्रारंभ होताना आनंद होत आहे. ही समृद्ध महाराष्ट्राची पायाभरणी आहे. एका आठवड्यापूर्वी ठाणे व पुणे येथे ३० हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ केला. राज्यात हजारो कोटींची विकासकामे केली जात आहेत.’’

‘विकासकामांवर सुपरवायझरसारखे लक्ष ठेवणार’

बिनधास्त आणि बेधडक बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ओळखले जातात. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी ‘मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, चुकून राजकारणात आलो. पण आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्यांनी फुंकल्याशिवाय राहणार नाही’ असा एक किस्सा सांगितला होता.

याशिवाय लाडकी बहीण योजनेवर बिनधास्त मत व्यक्त केले होते. आता विमानतळ भूमिपूजनाच्या कार्यक्रमातही त्यांनी मी रोज कामावर सुपरवायझरसारखे लक्ष ठेवणार असून जे काम चांगले होणार नाही ते तोडायला लावू ,असे सांगून टाकले.

वैद्यकीय शिक्षण मराठीतून

मुंबई - महाराष्ट्रात आता मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेता येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. राज्यातील दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांचा प्रारंभ मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झाला. यात ठाणे, मुंबई, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारदरा आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.