Nagpur Metro: नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा असणार 'इतक्या' किलोमीटर्सचा ! या शहरांमध्येही होणार मेट्रोचा विस्तार

देशात सुमारे ९०५ किमी लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे कार्यरत आहे. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांत मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे.
Nagpur-Metro
Nagpur-MetroNagpur-Metro
Updated on

Nagpur Metro Second Phase: देशात सुमारे ९०५ किमी लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे कार्यरत आहे. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांत मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. त्यात विशेषत: नागपूर शहरात आतापर्यंत ४० किलोमीटरचे मेट्रो रेल्वेचे जाळे तयार झाले असून मेट्रोचा दुसरा टप्पा डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार असून तो ४३ किमीचा असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी लोकसभेत दिली.

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. खा. तुमाने यांनी, सध्या देशात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या लांबीचे (किलोमीटर) राज्यवार तपशील काय आहेत.

राज्य,केंद्रशासित प्रदेश, ब्लॉक आणि शहर-निहाय तपशील आणि विलंबाची कारणे आणि प्रलंबित प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता किती वेळ आहे, परिचालित आणि मंजूर मेट्रो रेल्वे विभाग, विभाग आणि शहराच्या संदर्भात झालेली प्रगती तसेच ते केव्हा पूर्ण होण्याची आणि कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, असे तारांकित प्रश्न केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांना विचारले होते.(Latest Marathi News)

Nagpur-Metro
Multibagger Stocks: 'या' सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या तेजीची शक्यता, काय आहे कारण?

मंत्री हरदीपसिंह पुरी उत्तर देताना म्हणाले, मेट्रो रेल धोरण, २०१७ नुसार, केंद्र सरकारला जेव्हा जेव्हा संबंधित राज्य सरकारकडून प्रस्ताव सादर केला जातो, तेव्हा प्रस्तावाची व्यवहार्यता आणि संसाधनांची उपलब्धता यावर अवलंबून शहरे किंवा शहरी भागातील मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावांसाठी आर्थिक मदतीचा विचार केला जातो. (Latest Marathi News)

नागपूर शहरातील मेट्रोचा दुसरा टप्पा मिहान ते एमआयडीसीईएसआर, ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी, लोकमान्य नगर ते हिंगणा, प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर असा एकूण ४३.८० किमीचा असणार आहे. त्यासाठी ६ हजार ७०८ कोटी रुपयांची तरतूद असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी दिली.

Nagpur-Metro
Rahul Gandhi: 'संसदेत घुसखोरी झाली तेव्हा भाजप खासदार पळून गेले', सुरक्षेतील त्रुटींवर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.