CET Exam : बीबीए, बीसीएच्या विद्यार्थ्यांसाठी होणार सीईटी; तारखांची घोषणा लवकरच सीईटी सेलचे परिपत्रक

देशातील बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाचा समावेश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अख्त्यारित देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने सहा महिन्यांपूर्वी घेतला.
CET Exam : बीबीए, बीसीएच्या विद्यार्थ्यांसाठी होणार सीईटी; तारखांची घोषणा लवकरच सीईटी सेलचे परिपत्रक
Updated on

नागपूर : देशातील बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाचा समावेश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अख्त्यारित देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने सहा महिन्यांपूर्वी घेतला. मात्र, अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे देशातील लाखो विद्यार्थी आता प्रवेशापासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत सीईटी सेलने पालकांना आश्‍वस्त केले असून लवकरच सीईटीच्या तारखा घोषित करण्याचे परिपत्रक काढले आहे.

बीबीए आणि बीसीएनंतर करण्यात येत असलेली पदव्युत्तर पदवी ही अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येते. विद्यापीठ अनुदान आयोगाने जानेवारी महिन्यात एक परिपत्रक काढून यापुढे त्यामध्ये बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाचा समावेश करून त्यासाठी एक सामान्य प्रवेश परीक्षा घेण्याचे ठरविले.

त्यासाठी मार्च महिन्यात प्रवेश परीक्षेसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून एक लिंक सुरू करण्यात आली. एप्रिलपर्यंत ती लिंक सुरू होती. मार्च आणि एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी या लिंकवर नोंदणी केली नाही. राज्यातून केवळ ४० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

शहरातून केवळ २ हजार १०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यांची परीक्षा २९ मे रोजी परीक्षा घेण्यात आली. मात्र, अनेकांना या प्रवेश परीक्षेबाबत माहितीच नसल्याने या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी राज्यातील हजारो तर देशातील लाखो विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत पालकांनी मोठ्या प्रमाणात सीईटी सेलला तक्रारी केल्यात. त्यानुसार, राज्याच्या सीईटी सेलद्वारे पाठपुरावा करीत, सीईटी घेण्यासाठी मान्यता घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे.

विद्यापीठात १० हजारांवर जागा

विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांमध्ये बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी विद्यार्थ्यांच्या रांगा असतात. किमान दरवर्षी आठ ते दहा हजार प्रवेश या दोन्ही शाखेत होतात. मात्र, यंदा बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देता आली नसल्याने हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.