Bansilal Purohit:'हिंदी भाषेचा प्रचार प्रसार करणे प्रत्येकाची जबाबदारी'! राज्यपाल पुरोहित यांचे प्रतिपादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हिंदी भाषेची सर्वाधिक सेवा केली. या भाषेच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी वर्धाच्या भूमितच राष्ट्रभाषा प्रचार समितीची स्थापना केली.
Bansilal Purohit:'हिंदी भाषेचा प्रचार प्रसार करणे प्रत्येकाची जबाबदारी'! राज्यपाल पुरोहित यांचे प्रतिपादन
Updated on

Wardha: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हिंदी भाषेची सर्वाधिक सेवा केली. या भाषेच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी वर्धाच्या भूमितच राष्ट्रभाषा प्रचार समितीची स्थापना केली. हिंदी अतिशय प्रेमळ भाषा आहे. या भाषेचा प्रसार प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल तथा चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या वतीने समितीच्या परिसरात आयोजित ३१ व्या अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार संमेलनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रो. डॉ. सूर्यकुमार दीक्षित होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. रामदास आंबटकर, पत्रकार विमल मिश्र, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नुरूल हसन, समितीचे कार्याध्यक्ष हेमचंद्र वैद्य उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी आगमन होण्यापूर्वी राज्यपालांनी प्रचार समिती परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.देशाला विश्वगुरू बनविण्याचे ध्येय आपण बाळगले आहे. या ध्येयाला साध्य करण्यासाठी हिंदी भाषा माध्यम ठरणार आहे. प्रत्येकजण हिंदीप्रती प्रतिबद्ध असला पाहिजे. या प्रतिबद्धतेमुळेच प्रत्येक ठिकाणी हिंदीत भाषण करतो. हिंदी भाषेच्या प्रचारकांचे वर्तन साधे, स्वच्छ, निर्मळ असले पाहिजे, असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

राज्यपालांनी यावेळी हिंदीतील काही कवितांच्या ओळीही ऐकविल्या. यावेळी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते संगीता गोटे, कीर्ति मिश्रा, डॉ. रत्ना चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रभाषा मासिक पत्रिकेचे प्रकाशन देखील राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनुपमा गुप्ता यांनी केले. कार्यक्रमास हिंदी भाषिक साहित्यिक, विचारवंत, लेखक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bansilal Purohit:'हिंदी भाषेचा प्रचार प्रसार करणे प्रत्येकाची जबाबदारी'! राज्यपाल पुरोहित यांचे प्रतिपादन
Weather Update Today: दिल्लीत पुन्हा घसरणार पारा, 'या' राज्यांमध्ये गारांच्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यपालांची पवनार आश्रमास भेट
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमास भेट दिली. यावेळी त्यांनी विनोबांच्या समाधीचे दर्शन घेतले. आश्रमाची माहिती जाणून घेतली. पवनार आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम बजाज यांनी विनोबा भावेंचे कार्य व आश्रमाची माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन उपस्थित होते. (Latest Marathi News)

Bansilal Purohit:'हिंदी भाषेचा प्रचार प्रसार करणे प्रत्येकाची जबाबदारी'! राज्यपाल पुरोहित यांचे प्रतिपादन
अंगणवाड्यांमध्ये शिकवणार झेडपी शिक्षक? सेविका व मदतनीस कामबंद आंदोलनावर ठाम; २० दिवसानंतरही शासनाकडून तोडगा निघेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.