Amravati News : कॅथलॅबचे लोकार्पण ‘आरोग्य सेवासुविधा नियमित सुरू ठेवा’ - चंद्रकांत पाटील

सुपरस्पेशालिटी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कॅथलॅबमुळे विभागातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना हृदयरोगासंबंधीच्या आजारावर उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsakal
Updated on

अमरावती : सुपरस्पेशालिटी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कॅथलॅबमुळे विभागातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना हृदयरोगासंबंधीच्या आजारावर उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.

नवीन उपचार सेवासुविधा कार्यान्वित होत असताना त्या नियमितपणे सुरू राहाव्यात, याची जाणीवपूर्वक खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात (सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल) उभारण्यात आलेल्या हृदयरोगसंबंधीच्या कॅथलॅबचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार किरण सरनाईक, विभागीय आयुक्त

डॉ. निधी पाण्डेय, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, डॉ. मंगेश मेंढे, डॉ. अविनाश चौधरी, पदाधिकारी तुषार भारतीय, निवेदिता दिघडे यांच्यासह सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका व आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.

Chandrakant Patil
Nagpur Crime : मासोळी शिजविण्याचा वादात तिघांनी डोक्यात घातला दगड ;खुनामुळे सोनेगावात खळबळ दोघांना अटक

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या आजारांवर मोफत उपचार सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार खर्चाची मर्यादा वाढवून पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे.

या योजनेतून पाच लाखांपर्यंत खर्च येणाऱ्या मोठ्या आजारांसाठी उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. या योजनेचा जनतेने लाभ घ्यावा. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवाऱ्याची व भोजनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

Chandrakant Patil
Nagpur Accident: नागपूरमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना कारनं चिरडलं! दोघांचा मृत्यू, एक लहान मुलगा गंभीर जखमी

तसेच निम्म्या किंमतीत जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतील, यादृष्टीने एखादे फिरते वितरण केंद्र, यासारखा उपक्रम राबविण्यात यावा. यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घ्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी रुग्णालय प्रशासनाला केल्या.

जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयालाही भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. डॉक्टरांनीही आरोग्यसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून रुग्णांना मनापासून औषधोपचार सेवासुविधा पुरवाव्यात, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी कॅथलॅबची पाहणी करून शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद साधला.यावेळी रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.