नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करणारे भाजपचे नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरच कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Chandrashekhar Bawankule files Nana Patole Movement against)
कोविड मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन केल्याने बावनकुळे यांच्यावर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे बावनकुळे यांनी आपल्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. कोराडी येथे नाना पटोले यांना अटक करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर बावनकुळे यांनी कोराडी पोलिस ठाण्यात पटोले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करीत त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. परंतु या गंभीर तक्रारीची दखल घेण्याऐवजी पोलिसांनी बावनकुळे यांच्यावरच गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या कारवाईमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे करायला गेले काय आणि झाले काय अशी अवस्थ भाजपच्या कार्यकर्त्यांची झाली आहे. तीन दिवसांपासून बावनकुळे आक्रमकपणे आंदोलन करीत आहेत. ग्रामीण भागातील कुहीसह विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी तक्रारी दाखल केल्या. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल कराव यासाठी बुधवारी त्यांनी कोराडी पोलिस ठाण्याच्या आवारात आंदोलनसुद्धा केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.