चंद्रशेखर बावनकुळेंचा वडेट्टीवार, भुजबळांना सल्ला; काही काळ शांत बसा...

chandrashekhar bawankule latest Marathi news
chandrashekhar bawankule latest Marathi newschandrashekhar bawankule latest Marathi news
Updated on

नागपूर : राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी (OBC Reservation) काहीही केले नाही. आता शिंदे गट व भाजपचे सरकार आले आहे. हे सरकार शंभर टक्के ओबीसींना आरक्षण मिळवून देईल. तेव्हा वडेट्टीवार आणि भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काही काळ शांत बसावे. ओबीसींना राजकीय आरक्षण नक्की मिळेल, असे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. (chandrashekhar bawankule latest Marathi news)

नागपुरात शनिवारी (ता. १६) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना बावनकुळे यांनी हा सल्ला दिला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर १९ तारखेला सुनावणी आहे. तेव्हा योग्य बाजू मांडणार आहोत. मध्य प्रदेशच्या धर्तीवर अहवाल तयार करण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ओबीसींना आरक्षण मिळेल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

chandrashekhar bawankule latest Marathi news
राष्ट्रपती निवडणूक : आप विरोधकांसोबत; यशवंत सिन्हांना पाठिंबा जाहीर

ओबीसींना आरक्षण मिळवून देण्याची गरज असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे अडीच वर्षे झोपले होते. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारने काहीच केले नाही. वडेट्टीवार आणि भुजबळ हे फक्त मोर्चे काढत राहिले. त्यांनी ओबीसी आरक्षणाचा फुटबॅाल केला, असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने पहिला आयोग तयार केला त्यांना पैसे दिले नव्हते. सुप्रीम कोर्टाने लाथाळल्यानंतर मविआने बांठीया आयोग नेमला. बांठीया आयोगाचे ९० टक्के काम महाविकास आघाडी सरकारमध्ये झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या. आता शिंदे व फडणवीस सरकारवर टीका करण्याचा अधिकार त्यांना नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

chandrashekhar bawankule latest Marathi news
चीनने LAC वर बसवला 5G टॉवर; लडाखमधील नागरिकांमध्ये अस्वस्थता

...तर फेसबुक लाईव्ह केले असते

गडचिरोलीत पूर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने गडचिरोलीत पोहोचले आणि पाहणी केली. उद्धव ठाकरे यांचे सरकार असते तर गडचिरोली पूर आल्यावर फेसबुक लाईव्ह केले असते, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

विरोधकांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही

शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत बावचळले आहे. म्हणून त्यांना नागपुरात यावे लागले. आता राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार आले आहे. हे सरकार येवढे काम करेल की विरोधकांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. पेट्रोल- डिझेल स्वस्त, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवड असे अनेक चांगले निर्णय या सरकारने घेतले आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.