Chandrashekhar Bawankule : विरोधकांना किती टप्प्यात निवडणुका हव्या : बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानुसार, विरोधकांचा पराभव निश्चित आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal
Updated on

नागपूर : विधानसभेची निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका करणे सुरू केलेले आहे. भाजपच्या फायद्यासाठी एकाच टप्प्यात निवडणूक जाहीर करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. या आरोपाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे किती टप्प्यात निवडणुका घेतल्या म्हणजे समाधान होईल असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना फक्त टीका करणे आणि विरोध करणे एवढेच ठाऊक आहे. लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यात घेण्यात आली होती. त्यावेळीसुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हीच टीका केली होती. आता एकाच टप्प्यात निवडणुका जाहीर केल्या आहेत. तरीही त्यांची टीका कायम आहे.

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करणे हे समजू शकतो. मात्र आयोगावर टीका करणे म्हणजे ते पराभवाच्या मानसिकतेत आहे हे दिसून येत. त्यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे आता आयोगावर, निकालानंतर ईव्हीएमला ते दोषी ठरवतील असेही बावनकुळे म्हणाले.

महायुतीचे सध्या आहेत त्या पेक्षा जास्त आमदार निवडून येतील. अशी तयारी आम्ही केली आहे. डबल इंजिन सरकार महाराष्ट्राची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही मत मागणार आहोत. बुधवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात विद्यमान आमदाराच्या मतदार संघावर चर्चा करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.