नागपूर : मूळचे नागपूरकर असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी सेवानिवृत्त झाले. विशेष म्हणजे, शेवटच्या दिवशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी नागपूर खंडपीठाचे प्रकरण हाताळले. सोशल डिस्टन्सिंग पाळत उच्च न्यायालयाचे प्रशासन, न्यायमूर्ती, हायकोर्ट बार असोसिएशन आणि अनेक ज्येष्ठ वकिलांनी न्यायमूर्ती धर्माधिकारी यांना निरोप दिला.
अवश्य वाचा - त्यांनी लढविली अनोखी शक्कल, पण झाली अटक
नागपूरमध्ये वकिली करीत असताना १५ मार्च २००४ रोजी त्यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. ते अनेक महिने नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती होते. दरम्यान, त्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. तेथून त्यांची २० मार्च २०२० रोजी मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्याच महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्यांना विविध खंडपीठांना भेट देण्यास वेळ मिळाला नाही. या काळात त्यांनी प्रशासकीय सुत्रे सक्षमपणे सांभाळली. न्यायालयांतून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता त्यांनी केवळ अत्यावश्यक प्रकरणांवर सुनावणी घेणे, सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करणे इत्यादी अनेक कठोर निर्णय घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.