Chikhaldara : पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारे नैसर्गिक सौंदर्य खुलले; चिखलदरा हाउसफुल्ल

Chikhaldara latest news in marathi |दरी कपारीतून निघणारे धुके मन मोहित करीत आहे. त्यामुळे चिखलदऱ्याला आता चांगलीच गर्दी होऊ लागली आहे.
chikhaldara house full during rainy season natural beauty attracts tourists
chikhaldara house full during rainy season natural beauty attracts touristsSakal
Updated on

चिखलदरा : मागील दहा-बारा दिवसांपासून सतत पाऊस कोसळत असल्याने चिखलदरा परिसरातील डोंगर उतारावरून पांढरे शुभ्र धबधबे कोसळत असून पर्यटकांना मनमुराद आनंद देत आहेत. दरी कपारीतून निघणारे धुके मन मोहित करीत आहे. त्यामुळे चिखलदऱ्याला आता चांगलीच गर्दी होऊ लागली आहे. शनिवार तसेच रविवारी पर्यटक या निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेत असल्याने आज चिखलदरा हाउसफुल्ल होते.

चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन असून विदर्भातील एकमेव पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी पावसाळ्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावर्षी पावसाळा थोडा उशिरा सुरू झाल्याने जून महिना व जुलैच्या सुरवातीचा आठवडा पर्यटकांची संख्या कमी होती. परंतु मागील दहा-बारा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे आता पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.

या शनिवारी व रविवारी चिखलदरा हाउसफुल्ल झाले असून पर्यटकांची अलोट गर्दी झाली होती. सेमाडोह, कोलकास, ऐतिहासिक गाविलगड किल्ला, तीन हजार फूट उंचावरून कोसळणारा भीमकुंड धबधबा, पंचबोल पॉइंट, बोटिंग, देवी पॉइंट, जत्राडोह अशा सर्वच पॉइंटवर पर्यटकांची अलोट गर्दी होत आहे.

रानावनातील नागमोडी वळणाचे रस्ते, मधेच दिसणारे वन्यप्राणी, रानगवा व धो धो कोसळणारा पाऊस पर्यटकांना सुखावणारा ठरत आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून व मध्य प्रदेशातून सुद्धा पर्यटकांची चांगलीच गर्दी येथे होत आहे.

अर्थव्यवस्थेला बळ

चिखलदऱ्याची अर्थव्यवस्था जास्त करून पर्यटनावरच अवलंबून आहे. पावसाळा तसेच हिवाळ्यात येथे पर्यटकांची सर्वांत जास्त गर्दी होत असल्याने स्थानिकांना चांगला रोजगार उपलब्ध होतो. हॉटेलसोबतच लहानसहान व्यवसाय करणाऱ्यांना त्यातूनच आर्थिक बळ मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.