Dengue Patient : नागपूर शहरात महिनाभरात चिकनगुनियासह डेंगीग्रस्त दीडपट वाढले

नागपूर उपराजधानीत चिकनगुनिया आणि डेंगीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.
Dengue Infection
Dengue Infectionesakal
Updated on

नागपूर - उपराजधानीत चिकनगुनिया आणि डेंगीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून आजार टाळण्यासाठी उपाययोजना केल्याचा दावा केला जातोय. मात्र महापालिकेकडून ३० लाख लोकसंख्येच्या शहरात केवळ ६३८ चिकनगुनियाच्या संशयितांची तपासणी केली. त्यात १५२ जणांना आजार झाल्याचे समोर आहे.

डेंगीचे केवळ ६६७ नमुने तपासले असून यात ६३ जण बाधित निघाले. महापालिकेकडून संशयितांची तपासणी अल्प होत असल्याने रुग्ण मेयो,मेडिकलसह खासगी रुग्णालयांत रुग्ण धाव घेत आहेत. या रुग्णांच्या तपासणीचे आकडे समोर येत नसल्याची चर्चा मेयो- मेडिकलच्या वर्तुळात आहे.

मेयो,मेडिकलसह खासगी रुग्णालयातील साथ रुग्णांमध्ये गेल्या महिनाभरात दीडपट वाढ झाली आहे. ७० टक्के रुग्णांमध्ये चिकनगुनिया आणि डेंगीची लक्षणे आढळली आहेत. हे रुग्ण संशयित असून उपचारानंतर ते बरे होत आहेत. या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, सांधेदुखी, चढ-उतार ताप, गॅस्ट्रो आदी आजार आहेत.

वाढलेल्या १२५० पैकी ८७५ जणांना हंगामी आजार आहेत. जून महिन्यात मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला सरासरी अडीच हजार रुग्ण येत आहेत. दर २५ दिवस बाह्यरुग्ण सुरू असतो. त्यानुसार जून महिन्यात एकूण ६२ हजार रुग्णांची नोंदणी बाह्रयरुग्ण विभागात झाली. जुलै महिन्यात ही संख्या दीडपटीने वाढली आहे.

लसीकरणासंदर्भात टास्क फोर्सची बैठक

लसीकरण व मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया यासारखे डासांमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रणासाठी मनपाच्या पुढाकारातून टाक्स फोर्स समितीची बैठक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती उपस्थित होते. यावेळी फॉगिंग आणि स्प्रेईंग करणाऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करून प्रत्येक झोननुसार फॉगिंग आणि स्प्रेईंग नियम पाळले जावे, असे आदेश दिले गेले. लसीकरणाचाही आढावा घेण्यात आला.

७० टक्के रुग्ण विषाणूजन्य आजाराचे

दररोज सरासरी ३ हजार ७५० रुग्ण मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात आले. महिन्यात वाढलेल्या १२५० रुग्णांपैकी ७० टक्के म्हणजेच ८७ रुग्ण हवामानामुळे होणाऱ्या विषाणूजन्य आजाराचे आहेत. दुसरीकडे मनपाच्या नोंदीत चिकनगुनिया संशयितांचा आकडा केवळ ६३८ व डेंगी संशयिताचा आकडा केवळ ६६७ आहे. यावरून मनपाच्या आरोग्यदायी कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.