नागपूर : उपराजधानी गणेशोत्सव साजरा करीत आहे. मात्र सणासुदीच्या दिवसात साथीच्या आजारांमुळे घरोघरी चिकनगुनियाच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. एकिकडे महापालिका म्हणते, चिकनगुनिया आटोक्यात आहे. मात्र अवघ्या सहा दिवसांत तब्बल ११६ रुग्ण आढळले आहेत.
यामुळे आरोग्य यंत्रणा रुग्णांची माहिती व अपयश लपवत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सुटीच्या दिवशी डेंगी, चिकनगुनियाच्या चाचणया होत नाहीत. अशी माहिती पुढे आली आहे. यामुळे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापनाचे पितळ उघडे पडले आहे.