पोटासाठी चिमुकल्यांच्या पाठीवर पोतं!

टोलीतील आर्यन, सायनाच्या जगण्याला यावा अर्थ
children also walk streets carrying garbage on their backs
children also walk streets carrying garbage on their backssakal
Updated on

नागपूर : खरंतर उकिरड्यावर जनावरांचं पोट असतं. परंतु हल्ली उकिरडे माणसांचीही भूक भागवताहेत. उपजीविकेसाठी शहरातील उकिरडे शोधणं हे कामदेखील टोलीवासीय करतात. उकिरड्याच्या भरोशावर स्वातंत्र्यापूर्वी वसलेल्या टोलीतील हजारो कुटुंबाची भूक भागते. सूर्य उगवण्यापूर्वीच पोटासाठी महिला कचरा वेचण्यासाठी झोपडीबाहेर पडतात. एवढेच नव्हे तर टोलीतली चिमुकली मुलंदेखील पाठीवर पोतं घेऊन कचरा गोळा करण्यासाठी गल्लोगल्ली फिरतात.

children also walk streets carrying garbage on their backs
"जप्त केलेले पैसे परत करा..."; अत्तर व्यापाऱ्याची कोर्टात धाव

टोलीतील आर्यन कांबळे, गणेश लोंढे, सायना कांबळे, शालिनी मानकर ही १० वर्षांखालील चिमुकली मुले. भूक नावाची जखम भरण्यासाठी कचरा वेचतात. चिमुकली मुले रस्त्यावर कचरा वेचण्यासाठी निघत असल्याचे दृश्य बघून मन सुन्न होते. खांद्यावर पोतं घेऊन उकिरडा शोधण्यापासून या चिमुकल्यांच्या दिवसाची सुरुवात होते. रस्त्यावर फेकलेलं भंगार वेचणे, पोत्यात भरून घरी आणणे हेच आर्यन, गणेश आणि सायनाच आयुष्य. दिवसभर पोत्यात जमा झालेला माल भंगारवाल्याकडे विकण्याची जबाबदारी घरातील कोणीतरी सांभाळतात. दिवसाला शंभर रुपये मिळाले तरी पुरे. यांच्या घरापर्यंत शिक्षण पोहोचलं नाही. यामुळेच शिक्षणांचे महत्त्व यांना नाही. आता टोलीवाला मास्तर खुशाल ढाक टोलीत पोचला आहे. येथील मुलांना शिकवण्याची इच्छा. परंतु, पैसा-अडका नाही. जोवर फुकट शिक्षण होईल तोवर शिकतीनं.

children also walk streets carrying garbage on their backs
"PM मोदी लोकांना सांगतात मास्क वापरा अन् स्वत: मास्क वापरत नाहीत"

पुढं शिकासाठी यायच्या मायबापाने कुठून पैसा आणाचा? हा टोलीतील मास्तरांनी विचारलेला प्रश्न. हळूच आर्यनच्या पोत्यातील कचऱ्यात हात घालून ओला कागद टोलीवाले मास्तर काढतात. सदऱ्याले पुसून सांगतात, हा कागद विकला की, पैसे मिळतात, या कागदाले किंमत आहे साहेब. परंतु, टोलीत राहणाऱ्यांच्या हाडामांसाच्या माणसांच्या जिंदगीले नाही. रस्त्यावरचे खिळे जमा करण्यासाठी लोहाचुंबक असलेले अवजार चिमुकल्यांनी तयार केले. रस्त्यावरून चालताना हे अवजार मातीतून फिरवतात.

children also walk streets carrying garbage on their backs
नागपूर : एकाच दिवशी तिघांना ‘ओमिक्रॉन’ची बाधा

शाहरूखच्या मुलामुळे नाव आर्यन

सुपरस्टार शाहरूख खान याच्या मुलाचे नाव आर्यन आहे. यामुळे मुलाचे नाव आर्यन तर मुलीचे नाव सायना ठेवले; मात्र पोटासाठी कचरा वेचण्याचे काम नशिबी आल्याचे त्यांची आई सांगते. आर्यन, गणेश, सायना आणि शालिनी हे सर्व सोबतच कचरा वेचण्यासाठी जातात. सुरुवातीला नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. मात्र बाजूलाच टोलीवाले खुशाल मास्तर उभे होते. त्यांनी नाव विचारताच ही मुले बोलू लागली. हळूच सर म्हणून पाठीवरील पोते सरकवत चौघेही पुढे निघून गेले. त्यांच्या इवल्याशा पाठमोऱ्या आकृतीकडे बघून नकळत व्यवस्थेच्या विरोधातील विचारांनी मनात गर्दी केली.

children also walk streets carrying garbage on their backs
नागपूर : मांजामध्ये अडकून शेकडो पक्ष्यांचा मृत्यू

"कचऱ्यातून स्वतःचं विश्‍व तयार करण्यासाठी ही मुले परिश्रम घेत आहेत. सारे शिकत आहेत. या कचऱ्यातून या मुलांचे आयुष्य घडावे. यासाठी त्यांच्या हाती पुस्तक देण्याचा प्रयत्न सुरू आहे. टोलीत आता ‘स्कूल चले हम’चा नारा देण्यात आला. टोलीतील मुले शिकतील एक दिवस मोठी होतील, असा विश्वास आहे."

-खुशाल ढाक, टोलीवाला मास्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.