Nagpur News : नागरिकांचा माजी नगरसेवकाला चोप; हुडकेश्वर परिसरात घरात पावसाचे पाणी शिरल्याने नाराजी

हुडकेश्वर भागातील अनेक घरांमध्ये सोमवारी पावसाचे पाणी शिरले. रस्ते उंच आणि घरे खोलगट झाल्याने हा प्रकार घडला.
citizen beat ex corporator due to rain water entering house in hudkeshwar nagpur
citizen beat ex corporator due to rain water entering house in hudkeshwar nagpurSakal
Updated on

Nagpur News : पावसाचे पाणी घरात शिरल्याने संतापलेल्या नागरिकांनी एका माजी नगरसेवकाला मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. सोमवारी पाऊस झाल्यानंतर अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात डागा ले-आऊटमध्ये असा प्रकार झाल्याने नेत्यांना नागरिकांच्या असंतोषाला समोरे जावे लागले होते. महापालिका काहीच करीत नसल्याने माजी नगरसेवकाला रोषाला सामोरे जावे लागले.

हुडकेश्वर भागातील अनेक घरांमध्ये सोमवारी पावसाचे पाणी शिरले. रस्ते उंच आणि घरे खोलगट झाल्याने हा प्रकार घडला. या भागाचे माजी नगरसेवक दीपक चौधरी असून ते भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करतात.

घरामध्ये पाणी शिरण्यासाठी महापालिकाच जबाबदार असल्याचे गृहीत धरून संतप्त नागरिकांनी चौधरी यांना जाब विचारला. त्यावरून वाद होऊन नागरिकांनी चौधरी यांना मारहाण केली. यात चौधरी जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण नागपूर शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून त्यासाठी जुने रस्ते खोदण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने ही कामे पूर्ण करणे गरजेचे होते.

मात्र पावसाळा सुरू झाला तरी अनेक ठिकाणी ही कामे अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्ते नको असे म्हणण्याची वेळ नागपूरकरांवरआली आहे. अनेक वस्त्यानी याला विरोध केला आहे.

प्रशासकाचे खापर नेत्यांवर

सध्या महापालिकेवर प्रशासकाची राजवट आहे. मात्र, सलग १५ वर्ष भारतीय जनता पक्षाचीच सत्ता होती. त्यामुळे नागरिकांचा रोष या पक्षावर आहे. आताही माजी नगरसेवक विविध वस्त्यांना भेटी देत असतात.

लोक त्यांना त्यांच्या समस्या सांगतात. मात्र आता नगरसेवक नाही म्हणून ते हात वरती करतात. याचा संताप आहे. त्याचा उद्रेक आता होऊ लागला आहे. अशीच स्थिती अनेक भागात आहे. पावसानंतर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला येत्या काळात लोकप्रतिनिधींना सामोरे जाव लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.