बंद नागपूर फ्लाइंग क्लबला अडीच कोटी

८ महिन्यांपासून प्रशिक्षणच नाही, महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांचा प्रताप
नागपूर फ्लाइंग क्लब
नागपूर फ्लाइंग क्लबsakal
Updated on

नागपूर : २०१७ पासून बंद असलेल्या नागपूर फ्लाइंग क्लबसोबत ‘महाज्योती’च्या व्यवस्थापनाने करार करून विद्यार्थी प्रशिक्षणाच्या नावावर तब्बल अडीच कोटींचा निधी दिल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले. पाच महिन्यांपूर्वी निधी वळता करूनही अद्याप प्रशिक्षण सुरू करण्यात न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. दोषी व्यवस्थापकीय संचालकांची तत्काळ हकालपट्टी करा, अशी जोरकस मागणी विद्यार्थ्यांनी केली.

इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन केली. ही संस्था स्वायत्त आहे. शासनाचे संचालक व अशासकीय तज्ज्ञ तीन संचालक व महाज्योतीचे अध्यक्ष म्हणून इतर मागास समाजातील मंत्री आहेत. व्यवस्थापकीय संचालक पदावर प्रदीप डांगे कार्यरत आहेत. व्यवस्थापकीय संचालकांनी ७ जानेवारी २०२१ च्या संचालक मंडळामधे ओबीसी व भटक्या जाती जमातीअंतर्गत मोडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीच्या वतीने मोफत ‘कमर्शियल पायलट प्रशिक्षण’ देण्याची योजना सादर केली. यासाठी संचालक मंडळाची ३१ मे २०२१ रोजी बैठक घेतली. आणि याच काळात नागपूर फ्लाइंग क्लबला विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी अडीच कोटी रुपये दिले.

नागपूर फ्लाइंग क्लब
नागपूर शहरात अवघे चार मलेरियाग्रस्त

२०१७ पासून नागपूर फ्लाइंग क्लब बंद असल्याने प्रशिक्षणाची सोय नाही. विशेष असे की, प्रशिक्षण देण्याचा परवानासुद्धा मिळाला नाही. प्रशिक्षणासाठी आवश्यक विमाने, दुरुस्तीची साधने व पर्याप्त मनुष्यबळ फ्लाइंग क्लबकडे नाही. त्यामुळे बंद फ्लाइंग क्लबशी प्रशिक्षणाचा करार कसा केला, असा प्रश्न राज्यभरातील ओबीसी विद्यार्थांनी केला आहे.

गोंदियामध्ये असे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ती संस्था सुरू आहे. त्यांच्याशी करार करण्यापेक्षा बंद संस्थेशी करार करून व्यवस्थापकीय संचालकांनी महाज्योतीच्या संचालक मंडळाचीच नव्हे तर, महाज्योतीचे अध्यक्ष माननीय मंत्रीमहोदय विजय वडेट्टीवार यांचीही दिशाभूल केल्याचे सिद्ध होत असल्याचे एका विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे. प्रत्येकच योजनेत घोळ करणाऱ्या वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालकांची तत्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे.

प्रशिक्षण का सुरू झाले नाही?

आठ महिन्यांपूर्वी निधी दिला. यानंतर महिन्या-दोन महिन्यांत विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी नोंदणीसह प्रशिक्षणासाठी प्रवेश होणे आवश्यक होते. परंतु एकाही विद्यार्थ्याची नोदणी झाली नाही. महाज्योतीचा निधी बंद संस्थेला देऊन ओबीसींना प्रशिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रकार आहे, अशी टीका ओबीसी कृती संघर्ष समितीने केली. ओबीसींचे हितचिंतक असलेल्या तिन्ही संचालकांनी आणि विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेत महाज्योतीत भोंगळ कारभार करणाऱ्या व्यवस्थापकीय संचालकांची हकालपट्टी करावी, अशी मागणी ओबीसी समाजाकडून होत आहे. महाज्योतीअंतर्गत ओबीसींचा विकास होत नसेल तर संस्थेचा काय उपयोग, असा सवाल ओबीसी कृती संघर्ष समितीने केला.

नागपूर फ्लाइंग क्लब
अकोला : जिल्ह्यात ऑगस्टअखेर हजार मुलांमागे ९७२ मुलींचा जन्म

महाज्योती ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्थापन केली आहे. नागपूर फ्लाइंग क्लब या बंद संस्थेशी करार करून महाज्योतीने काय साध्य केले. सात, आठ महिने लोटल्यानंतरही एकाही ओबीसी विद्यार्थ्यांला प्रशिक्षणाचा लाभ झाला नाही. सुरू असलेल्या संस्थांशी करार करण्याची गरज होती. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेत ओबीसींच्या हितासाठी महाज्योतीने काम करावे.

-खेमेंद्र कटरे, अध्यक्ष, ओबीसी कृती संघर्ष

नागपूर फ्लाइंग क्लब बंद नाही. या क्लबचे अपग्रेडेशन सुरू आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थी संख्या वाढणार आहे. पायलट प्रशिक्षण देण्याचा परवाना नूतनीकरणासाठी सादर केला आहे. यामुळे ही संस्था बंद आहे, असे म्हणता येत नाही. विशेष असे की, दोन्ही शासकीय संस्था आहेत. दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळात करार झाला. त्या कराराची अंमलबजावणी झाली.

-प्रदीप डांगे, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.