नागपूर : एक, दोन नव्हेतर तब्बल १४४ कर्णबधिर मुलांवर केंद्र शासनाच्या ‘एडीआयपी’ योजनेंतर्गत कॉक्लीअर इम्प्लान्ट करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आई-वडिलांच्या हाकेला ‘ओ'' दिला. यामुळे गरीब पालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान हीच मेडिकमधील कान- नाक- घसा रोग विभागातील डॉक्टरांच्या यशाची पावती आहे. याचे श्रेय सहयोगी प्राध्यापक डॉ. कांचन तडके यांचे आहे.