Medical Seats in Maharashtra : गेल्या वर्षी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांत पदवी शाखा अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या १ लाख २५ हजार होती. या जागांवर प्रवेशासाठी तब्बल २१ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. यावेळी विद्यार्थ्यांची संख्या २४ लाखांवर जाणार आहे. जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी स्पर्धा वाढली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र दरवर्षी उमेदवारांची संख्या वाढत असल्याने स्पर्धाही वाढत आहे. समान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात जात आहे. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात यश न मिळाल्यास दुसऱ्या आणि तिसऱ्या संधीसाठी विद्यार्थी तयार असतात.
अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना नीटने आणखी २ दिवस दिले होते. याआधी अर्ज करणाऱ्यांची संख्या २३ लाख ८१ हजार ९३३ होती. आता ती २४ लाखांच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज आहे. सध्या २५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तर ४ शासकीय दंत महाविद्यालये आहेत. येत्या काही दिवसात ही संख्या ३२ होईल.
वाढत्या स्पर्धेमुळे महाराष्ट्रात एमबीबीएसच्या जागाही वाढल्या आहेत. यावेळी राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश दिले जाणार आहेत. राज्यातील ३२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत ५ हजार १२५ जागा आहेत. यामध्ये नागपूर एम्स, पुणे एएफएमसी आणि मुंबई महापालिकेच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. तर खासगी महाविद्यालयांमध्ये ३ हजार ५१० जागा आहेत. तर अभिमत विद्यापीठांमध्ये २ हजार ५१० जागा आहेत. सध्या राज्यात एकूण ११ हजार १४५ जागा उपलब्ध आहेत. बहुतांश विद्यार्थी शासकीय महाविद्यालयांकडे धाव घेतात. परंतु त्यासाठी उच्चांकी गुणांची आवश्यकता असते. यामुळेच ४० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी दुसऱ्यांदा प्रवेश परीक्षा देतात.
विद्यार्थ्यांची आकडेवारी
वैद्यकीय ‘नीट’ चाळणी परीक्षेसाठी - २४ लाख विद्यार्थी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - ५,१२५ जागा
खासगी वैद्यकीय महाविद्यालय - ३,५१० जागा
अभिमत विद्यापीठ - २,५१० जागा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.