नागपूर : कोराडीतील राणे कुटुंबाच्या आत्महत्या प्रकरणाचा गुंता वाढत असून चार अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र पोलिसांच्या हाती ठोस असे अद्याप काहीच लागले नसल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. सुषमा राणे हिने पती प्रा. धीरज राणे, मुलगा ध्रुव आणि मुलगी लावण्या यांना जेवणातून झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर तिघांनाही ॲनेस्थेसियाचे हायडोज इंजेक्शन्स दिलेत. तिघांचाही मृत्यू झाल्यानंतर डॉ. सुषमाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मंगळवारी घडलेल्या राणे कुटुंब आत्महत्या प्रकरणाचा गुंता वाढता वाढत चालला आहे.
आत्महत्या प्रकरणाचे गुढ अद्यापही कायम आहे. या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी निलोत्पल करीत आहेत. डॉ. सुषमा राणे हीने पती व मुलांचा जीव का घेतला? याचा उलगडा पोलिसांना करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलिसांच्या हाती ठोस असे अद्याप काहीच लागले नसल्याची चर्चा आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या सुसाईड नोटमधील मजकुरावरून पोलीसांना अद्याप काहीच गवसले नाही.
पोलिसांनी आज नातेवाईक व कॉमन मित्रांची चौकशी केली. आज बुधवारी पोलिसांना राणे दाम्पत्य राहात असलेल्या घराशेजारी भूखंडावर इंजेक्शनची बाटली सापडली. त्याद्वारे डॉ. सुषमाने पती व मुलांना झोपेतच विष दिले. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून पोलिसांना सुषमाने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात तिने पतीला दररोज तणावात मरताना बघू शकत नाही, असे लिहिले आहे. त्यामुळे सर्वजण सामूहिकपणे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असून चिठ्ठीच्या शेवटी सर्वांची नावे लिहिली आहेत. पण, पती कोणत्या कारणामुळे तणावात होता, हे स्पष्ट होत नाही आहे. शवविच्छेदन अहवालात तिघांच्या मृत्यूचे कारण राखून ठेवण्यात असून डॉ. सुषमाच्या मृत्यूचे कारण गळफास हे देण्यात आहे.
त्यांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवविण्यात आले. धीरज हा संशयी वृत्तीचा होता. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. या कारणामुळे तो दररोज दारू प्यायचा. त्याचे दारू व्यसन वाढत होते. त्याला या परिस्थितीत डॉ. सुषमा बघू शकत नव्हती. त्यामुळे त्याची दारू सोडण्यासाठी उपचार सुरू केले होते. पण, त्यानंतरही तो दारू प्यायचा, अशी माहिती नातेवाईकांच्या जबाबातून समोर आली आहे.
प्रा. धीरज आणि डॉ. सुषमा यांच्यातील संबंध फारसे नीट नव्हते. दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. दोघेही बेडरूममध्ये दार बंद करून भांडत होते. मुलांसमोर काहीच न घडल्यासारखे वागत होते. आत्याकडेसुध्दा कशावरून वाद झाल्याचे सांगत नव्हते.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.